Pillu Bachelor Trailer Out : वडील आणि मुलगा यांच्यातील संघर्ष, प्रेमकथा आणि त्याला असलेल्या विनोदाच्या फोडणीतून 'पिल्लू बॅचलर' (Pillu Bachelor) हा सिनेमा प्रेक्षकांची पुरेपूर हसवणूक करणार आहे. दमदार स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला असून, हा सिनेमा 15 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


वर्षा पाटील, सुनील फडतरे, अभिजित देशपांडे यांनी 'पिल्लू बॅचलर' चित्रपटाची निर्मिती केली आहे. अरविंद जगताप (Arvind Jagtap) यांनी लिहिलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन तानाजी घाटगे यांनी केलं आहे. बस्ता, बरड असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी या पूर्वी दिले आहेत.


तगडी स्टारकास्ट असलेला 'पिल्लू बॅचलर' (Pillu Bachelor Starcast) 


मंगेश कागणे यांनी गीतलेखन, चिनार महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन, अनंत कामथ यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. 'पिल्लू बॅचलर' या सिनेमात पार्थ भालेराव, सायली संजीव, अक्षया देवधर, शिवाली परब, शशांक शेंडे, डॉ. मोहन आगाशे, भारत गणेशपूरे, सविता मालपेकर, अक्षय टांकसाळे, किशोर चौघुले असे उत्तमोत्तम कलाकार आहेत. 






वडील आणि मुलगा यांच्यातील संघर्षाची गोष्ट 'पिल्लू बॅचलर'


वडील आणि मुलगा यांच्यातील संघर्षाची गोष्ट 'पिल्लू बॅचलर' या सिनेमात दाखवण्यात आली आहे. मात्र प्रेमकथा, त्याला हलक्या विनोदाचा तडका सिनेमात असल्याचं सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे हा सिनेमा पुरेपूर मनोरंजन करणारा ठरतो. 'पिल्लू बॅचलर'ने नावापासूनच उत्सुकता निर्माण केली आहे. त्यामुळे मनसोक्त हसवणुकीसाठी प्रेक्षकांना केवळ 15 डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे. 


मराठी मनोरंजनसृष्टीत वेगवेगळे प्रयोग होत आहेत. विविध विषयांवर भाष्य करणारे, वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ऐतिहासिक, रोमँटिक, विनोदी अशा विविध सिनेप्रकारांचा यात समावेश आहे. या सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता 'पिल्लू बॅचलर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. पार्थ भालेराव, सायली संजीव, अक्षया देवधरपासून डॉ. मोहन आगाशेपर्यंत अनेक कलाकार या सिनेमासोबत जोडले गेले आहेत. 


'पिल्लू बॅचलर'चा ट्रेलर पाहा : 



संबंधित बातम्या


Boyz 4 : 'बॉईज 4'ची दिवाळी स्पेशल ऑफर; फक्त 99 रुपयांत पाहा चित्रपट