Songya Official Trailer: अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. ऋतुजानं अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. लवकरच ऋतुजाचा सोंग्या (Songya) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. 


यशराज आणि शुभ्रा यांची प्रेमकथा


"आपल्या समाजाच्या ज्या प्रथा- परंपरा आहेत, त्या आपल्या पूर्वजांनी बनवल्या आहेत. त्यांचे पालन करणं आपलं कर्तव्य आहे." हा डायलॉग  सोंग्या या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला ऐकू येतो. त्यानंतर ट्रेलरमध्ये यशराज आणि शुभ्रा यांची लव्ह स्टोरी दाखवण्यात येते. अभिनेता अजिंक्य ननावरेनं सोंग्या या चित्रपटात यशराजची भूमिका साकारली आहे. ट्रेलरमध्ये दिसते की, शुभ्रा ही यशराज म्हणते,  "मी प्रथा- परंपरा  मानत नाही" पण त्यानंतर शुभ्रा आणि यशराज यांच्या प्रेमकथेमध्ये अनेक ट्वीस्ट येतात. 


पाहा ट्रेलर:






 "एका लढवय्या मुलीची कहाणी..सोंग्या ह्यो नेमका विषय काय आहे ?? असा प्रेक्षकांच्या मनात प्रश्न होता..आता प्रतीक्षा संपली !!", असं कॅप्शन सोंग्या या चित्रपटाच्या ट्रेलरला देण्यात आलं आहे. या चित्रपटाची रिलीज डेट अजून जाहीर करण्यात आलेली नाही. 


ऋतुजा बागवेचे आगामी चित्रपट


सोंग्या या चित्रपटासोबतच ऋतुजाचे आणखी काही आगामी चित्रपट रिलीज होणार आहेत. तिच्या  'लंडन मिसळ' या आगामी चित्रपटाची देखील प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट  8 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात  ऋतुजासोबतच  रितिका श्रोत्री, माधुरी पवार, गौरव मोरे, निखील चव्हाण, ऋतुराज शिंदे आणि सुनील गोडबोले हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 


ऋतुजानं  ‘शहीद भाई कोतवाल’ या मराठी चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. एका लग्नाची तिसरी गोष्ट, नांदा सौख्य भरे, चंद्र आहे साक्षीला या मालिकांमध्ये ऋतुजानं प्रमुख भूमिका साकारली. तिच्या अनन्या या नाटकाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. ऋतुजाचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


London Misal Trailer : फुल टू धमाल... भरत जाधव, गौरव मोरेच्या 'लंडन मिसळ'चा ट्रेलर रिलीज