Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Girija Oak Godbole: 'जवान' मध्ये शाहरुखसोबत काम करण्याचा अनुभव ते जाहिरातींची दुनिया; गिरिजा ओकनं उलगडली पडद्यामागची गोष्ट


Girija Oak Godbole: प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले (Girija Oak Godbole) ही सध्या  तिच्या जवान या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट आज रिलीज झाला आहे. नुकतीच मित्र म्हणे या युट्यूब चॅनलला गिरिजानं मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये गिरिजानं जवान (Jawan) या चित्रपटाचं शूटिंग करताना आलेला अनुभव, शाहरुखसोबत  (Shah Rukh Khan)  काम करताना आलेला अनुभव आणि जाहिरातींची दुनिया या विषयांवर चर्चा केली.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Amchya Papani Ganpati Anla:'मला मोठेपणी रितेश देशमुखसारखं व्हायचंय...'; "आमच्या पप्पांनी गणपती आणला" फेम साईराज केंद्रेनं व्यक्त केली इच्छा


Amchya Papani Ganpati Anla:  "आमच्या पप्पांनी गणपती आणला"  (Amchya Papani Ganpati Anla) या गाण्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला क्युट हावभाव करताना दिसत आहे. या चिमुकल्या मुलाचं नाव साईराज केंद्रे आहे. साईराज हा  चार वर्षांचा आहे. साईराजच्या "आमच्या पप्पांनी गणपती आणला"  या गाण्यावरील व्हिडीओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी लाइक केलं आहे. नुकतीच  एबीपी माझाने साईराज केंद्रेची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये साईराजनं एक इच्छा व्यक्त केली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Subodh Bhave : कधी काही चूक झाली तर त्याच्याकडे जातो अन्...; सुबोध भावे आणि बाप्पाचं नातं आहे खास


Subodh Bhave On Kalavantancha Ganesh : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) सध्या त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. बाप्पाबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाला,"गणपती बाप्पाचं आणि माझं मैत्रीचं नातं आहे. गेल्या 100 वर्षांपासून आमच्या घरी बाप्पा येत आहे". 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Khupte Tithe Gupte : “तुम्ही मनसेमध्ये सामील होत का नाही?” अवधूत गुप्तेचा प्रश्न, अभिजीत बिचुकले म्हणाले...


Khupte Tithe Gupte :   ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte) कार्यक्रमामध्ये  अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) हे हजेरी लावणार आहेत. नुकताच 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये अवधूत गुप्तेच्या प्रश्नाला  अभिजीत बिचुकले उत्तर देताना दिसत आहेत.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Beed News : "आमच्या पप्पानी गणपती आणला... "आपल्या खट्याळ हावभावांनी भूरळ घालणारा चिमुकला साईराज केंद्रे 'एबीपी माझा'वर


Beed News : मागच्या दोन-तीन दिवसांपासून अनेकांच्या मोबाईलवर एक छोटा व्हिडीओ आला असेल ज्यामध्ये एक चार वर्षाचा चिमुकला "आमच्या पप्पांनी गणपती आणला" या गाण्यावर एक्टिंग करताना सगळ्यांनीच बघितला असेल. हे पाहून तुम्हाला हा मुलगा नेमका कोण आहे? आणि तो रातोरात कसा स्टार झाला? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. याच मुलाशी एबीपी माझाने बातचीत केली आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा