Girija Oak Godbole: प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले (Girija Oak Godbole) ही सध्या  तिच्या जवान या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट आज रिलीज झाला आहे. नुकतीच मित्र म्हणे या युट्यूब चॅनलला गिरिजानं मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये गिरिजानं जवान (Jawan) या चित्रपटाचं शूटिंग करताना आलेला अनुभव, शाहरुखसोबत  (Shah Rukh Khan)  काम करताना आलेला अनुभव आणि जाहिरातींची दुनिया या विषयांवर चर्चा केली.


गिरिजा ओकनं जवान या चित्रपटाबद्दल मुलाखतीमध्ये सांगितलं, 'मी जवान चित्रपटाचं दोन वर्ष शूट केलं. हा खूप थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता. शाहरुख हा सेटवर पूर्णपणे तयारीत येत होता. त्याच्यामुळे रिटेक झाला तर इतर सहकलाकारांची माफी मागतो. त्याच्याबद्दल जे आपण ऐकतो की, खूप चांगला माणूस आहे, तो खूप अदबीनं वागतो आहे. या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत.'


गिरिजानं अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. जाहिरातींबाबत गिरिजा म्हणाली, 'मी लहान असताना मला जाहिराती  खूप आवडत होत्या. मला आठवतं की, एकदा टिव्ही लावला होता तेव्हा जाहिराती सुरु होत्या. तेव्हा कोणीतरी टिव्ही बंद केला. टिव्ही बंद केला म्हणून मी रडायला सुरुवात केली. मी 'जिलाती जिलाती' असं म्हणून रडत होते. मला जाहिराती बघायच्या होत्या मी त्याला जिलाती म्हणत होते. मी पहिली जाहिरात केली तेव्हा मी 12 वर्षांची होते.'


पुढे गिरिजानं सांगितलं,  'जाहिरातींमध्ये दिसणारं दूध हे फेविकॉल असतं. कारण दुधात कॉनफ्लेक्स टाकलं की ते बुडतं. त्यामुळे दुधाच्या जागी फेविकॉल वापरलं जातं. जाहिरातींमध्ये मी नेहमी अशा आईची भूमिका साकारते जी दुसऱ्या आईला प्रोडक्टबद्दल सांगत असते. '


जवाननंतरच्या आगामी चित्रपटाबद्दल गिरिजा  म्हणाली,'जवाननंतर माझा 'द वॅक्सिन वॉर' हा चित्रपट देखील रिलीज होणार आहे. ही विवेक अग्निहोत्री यांची फिल्म आहे.'






जवान चित्रपटात विजय सेतुपती, नयनतारा, दीपिका पादुकोण यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.अॅटलीनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.


संबंधित बातम्या


Shah Rukh Khan : थिएटरमध्ये जल्लोष, थर रचत गोविंदांची सिनेमाला सलामी.. शाहरुखच्या 'Jawan'चा फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल्ल; चाहते म्हणाले...