Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Chinmay Mandlekar: 'सिग्नलला थांबलेलं असताना...'; चिन्मय मांडलेकरच्या पोस्टनं वेधलं लक्ष; नेटकरी म्हणाले, 'पुणे तिथे काय उणे'
Chinmay Mandlekar: अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) हा सध्या त्याच्या 'सुभेदार' (Subhedar) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. चिन्मय मांडलेकरनं सुभेदार या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. चिन्मय हा सोशल मीडियावर त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देत असतो. नुकतीच चिन्मयनं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Spruha Joshi: "नेहमीप्रमाणे माझ्या पाठीशी तो उभा राहिला ..."; लोकमान्य मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर स्पृहा जोशीने शेअर केली खास पोस्ट
Spruha Joshi: छोट्या पडद्यावरील लोकमान्य (Lokmanya) या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या लोकमान्य या मालिकेमध्ये अभिनेता क्षितिष दातेने लोकमान्य टिळकांची भूमिका साकारली. तसेच अभिनेत्री स्पृहा जोशीनं (Spruha Joshi) या लोकमान्य टिळक यांची पत्नी सत्यभामाबाई यांची भूमिका साकारली. लोकमान्य मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर स्पृहानं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. तिच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Sandeep Pathak: "....असा झाला होता 'वऱ्हाड निघालंय लंडनला' चा पहिला प्रयोग" जेव्हा संदीप पाठकनं सांगितलं होता किस्सा; जाणून घ्या अभिनेत्याच्या नाटक, चित्रपट आणि मालिकांबद्दल....
Sandeep Pathak: अभिनेता संदीप पाठक (Sandeep Pathak) हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. तो नाटक, चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतो.संदीपला वऱ्हाड निघालंय लंडनला या नाटकामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. एका मुलाखतीमध्ये संदीपनं वऱ्हाड निघालंय लंडनला (Varhad Nighalay Londonla) या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाचा किस्सा सांगितला होता.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Shubhangi Gokhale: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत अभिनेत्री शुभांगी गोखले साकारणार 'ही' भूमिका; म्हणाल्या, 'प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारं असावं...'
Premachi Gosht: 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Gosht) ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये नात्यांची गुंफण दाखवण्यात येणार आहे. चिमुकल्या सईवरच्या प्रेमापोटी दोन विभिन्न स्वभावाचे मुक्ता आणि सागर कसे एकत्र येतात आणि त्यांच्यातलं प्रेम कसं बहरत जातं हे सांगणारी सुंदर,तरल कथा म्हणजे प्रेमाची गोष्ट ही मालिका. मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. या मालिकेत मुक्ता म्हणजेच तेजश्री प्रधानच्या आईची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले (Shubhangi Gokhale) साकारणार आहेत. प्रेमाची गोष्ट या मालिकेमधील भूमिकेबाबत शुभांगी गोखले यांनी माहिती दिली.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Subhedar Trailer: "आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं..."; 'सुभेदार' चित्रपटाचा ट्रेलर आला प्रेक्षकांच्या भेटीस
Subhedar Trailer: दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्या 'सुभेदार' (Subhedar) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरला अवघ्या काही तासातच हजारो व्ह्यूज मिळाले आहे. या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळाली असून नेटकऱ्यांनी या ट्रेलरवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.