Chinmay Mandlekar: अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) हा सध्या त्याच्या 'सुभेदार' (Subhedar) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. चिन्मय मांडलेकरनं सुभेदार या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. चिन्मय हा सोशल मीडियावर त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देत असतो. नुकतीच चिन्मयनं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
चिन्मय मांडलेकरची पोस्ट
चिन्मय मांडलेकरनं (Chinmay Mandlekar) एका बोर्डचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या बोर्डवर पु.ल.देशपांडे (Purushottam Laxman Deshpande) यांचे विचार लिहिलेले दिसत आहे. त्या बोर्डवर लिहिलं आहे, मराठीला जी "मज्जासंस्था" वाटते, तीच इंग्रजीला "नर्वस सिस्टम" वाटते. फक्त दृष्टिकोनाचा फरक आहे.
चिन्मयनं या बोर्डचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "पुणे शहर, सिग्नलला थांबलेलं असताना ही कधी कधी शिकवण देतं!" चिन्मयनं शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
चिन्मयच्या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. चिन्मयच्या या पोस्टला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'हो ते तर आहेच, पुणे तिथे काय उणे.. पण उत्तम वाक्य' तर दुसऱ्या युझरनं 'अगदी बरोबर' अशी कमेंट केली आहे.
चिन्मयचा आगामी चित्रपट
सनी, द कश्मीर फाइल्स ,पावनखिंड, शेर शिवराज यांसारख्या चित्रपटांमधून चिन्मय प्रेक्षकांच्या भेटीस आला. 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटामधील चिन्मयच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. चिन्मय हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. आता त्याचा सुभेदार हा चित्रपट 18 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात चिन्मय मांडलेकरसोबतच अजय पुरकर, मृणाल कुलकर्णी,विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
चिन्मय हा विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करतो. त्याला इन्स्टाग्रामवर 104K फॉलोवर्स आहेत. चिन्मयच्या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळत असते.
हेही वाचा :
Chinmay Mandlekar : चिन्मय मांडलेकरची पोस्ट चर्चेत; म्हणाला, 'मायबाप प्रेक्षकांना विनम्र आवाहन'