Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Milind Gawali: "पहाटे साडेतीन वाजता पुण्याहून ठाण्यात...";'आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळींच्या पोस्टनं वेधलं लक्ष


Milind Gawali: अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) हे आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतात.  या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. आई कुठे काय करते या मालिकेमध्ये मिलिंद हे अनिरुद्ध ही भूमिका साकारतात. मिलिंद गवळी हे आई कुठे काय करते या मालिकेबरोबरच सोशल मीडियावरील पोस्टमुळे देखील चर्चेत असतात. नुकतीच मिलिंद गवळी यांनी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Vaibhav Mangle: अभिनेते वैभव मांगलेंनी शेअर केला 21 वर्षापूर्वीचा फोटो; म्हणाले, "वक्त वक्त की बात होती है"


Vaibhav Mangle: अभिनेते वैभव मांगले (Vaibhav Mangle) हे चित्रपट, मालिका आणि  नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. वैभव मांगले हे सोशल मीडियावर देखील विविध पोस्ट शेअर करतात. नुकताच वैभव मांगले यांनी एक खास फोटो सोशल मीडियावर (Social media) शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या या फोटोनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Tejaswini Pandit: "राज ठाकरे हे मुख्यमंत्री नाहीत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे"; तेजस्विनी पंडितच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष


Tejaswini Pandit: मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) काही दिवसांपूर्वी टोलसंदर्भात एक ट्वीट शेअर केले होते. तिच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले होते. तेजस्विनीच्या या ट्वीटनंतर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. टोलचे पैसे कुणाच्या खिशात जातात? असा प्रश्न तेजस्विनीनं तिच्या ट्वीटच्या माध्यमातून उपस्थित केला होता. आता ‘लोकमत फिल्मी’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तेजस्विनीनं तिच्या ट्वीटबाबत सांगितलं. तसेच तिनं या मुलाखतीमध्ये  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे देखील कौतुक केले आहे.  


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Chinmay Mandlekar: "करोडो शून्यांपेक्षा 'एक' कधीही मोठा असतो"; चिन्मय मांडलेकरचं 'गालिब' नाटक येणार प्रेक्षकांच्या भेटीस


Chinmay Mandlekar:  अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar)  हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. चिन्मय हा सध्या त्याच्या काला पानी या वेब सीरिजमुळे चर्चेत आहेत. या वेब सीरिजमधील चिन्मयच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. तसेच चिन्मयचा 'सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ' हा चित्रपट देखील लवकरच रिलीज होणार आहे. चिन्मयचं आता एक नवं कोरं नाटक देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चिन्मयनं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करुन  या नाटकाची माहिती चाहत्यांना दिली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री वडिलांच्या आठवणीत भावूक; म्हणाली, "शेवटच्या श्वासापर्यंत..."


Seema Ghogale: अभिनेत्री सीमा घोगले (Seema Ghogale)  यांनी 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte)  या मालिकेत विमल ही भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. सीमा घोगले  यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा