Milind Gawali: अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) हे आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतात. या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. आई कुठे काय करते या मालिकेमध्ये मिलिंद हे अनिरुद्ध ही भूमिका साकारतात. मिलिंद गवळी हे आई कुठे काय करते या मालिकेबरोबरच सोशल मीडियावरील पोस्टमुळे देखील चर्चेत असतात. नुकतीच मिलिंद गवळी यांनी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
मिलिंद गवळी यांनी पेस्टमध्ये लिहिलं, "मैं अकेला चलता गया और कारवा बनता गया ! मी आठवीत शारदाश्रम विद्यामंदिर दादर या शाळेत असताना, कोणीतरी मला सांगितलं की फिल्म दिविजन मध्ये एका बाल चित्रपटाचं कास्टिंग चालू आहे आणि मला चांगलं आठवतं की 63 नंबरची b.e.s.t ची बस पकडून मी जसलोक हॉस्पिटल च्या समोर फिल्म्स डिव्हिजन च्या ऑफिस मध्ये पोहोचलो, इथे दोन माणसं ऑडिशन घेत होती, त्यांनी मला आत studio त बोलवलं आणि काही प्रश्न विचारले, नाव काय? पत्ता काय?राहतोस कुठे? आई वडील काय करतात? आणि यापूर्वी एक्टिंगचा काही अनुभव आहे का? मी त्यांना सांगितलं हो आहे! एका नाटकात मी काम केलं होतं! ते खोटं बोलणं माझ्या अंगाशी आलं,कारण लगेचच ते दोघ एकदमच म्हणाले, काहीतरी परफॉर्म करून दाखव. झाली ना माझी पंचायत!"
"मी पण दीड शहाणा होतोच, जिद्दी ही होतोच, तिथल्या तिथे एक नाटकाचा सिन डोक्यात तयार केला आणि बोलायला सुरुवात केली, माझा परफॉर्मन्स बघून त्यांना नक्कीच कळलं असणार की हा थापा मारतो आहे.तेव्हाच मला ही कळलं होतं की मला काही हे लोक कास्ट करणार नाहीत. पण तो सगळा प्रवास, ती जर्नी मला सुखावून गेली, ते film divisionच Office, इथे लागलेले पोस्टर्स, STUDIO ambience. या सगळ्यांनी मी भारावूनच गेलो होतो, मला हे विश्व स्वप्नावत वाटत होतं. माझ्या शाळेत ल्या मित्रांचं आधीच ठरलं होतं ते मोठे झाल्यावर ते काय बनणार आहेत, जयंत कारेकर डॉक्टर, रमेश महाडीक इंजीनियर, रमाकांत घनाते चार्टर्ड अकाउंटेंट ,एकदा मला माझ्या शाळेतल्या मित्रांनी विचारलं , मिल्या तू मोठा झाल्यावर काय होणार आहेस ? तू काही ठरवलं आहेस का? आणि मी सेकंड थॉट न देता उत्तर दिलं होतं , की मला ॲक्टर Actor होणार आहे ! ते सगळेच हसले होते, माझे चेष्टा केली होती , पण मी पक्का निश्चय केला होता . आपण अभिनेताच व्हायचं.यानंतर मी कोणालाही कधीही सांगितलं नाही की मला अभिनेता व्हायचं आहे.पण मनामध्ये दृढ निश्चय केला होता,हा प्रवास आपल्याला एकट्यालाच करायचा आहे हेही मला माहित होतं, म्हणूनच म्हटलं, “मैं अकेला चलता गया और कारवा बनता है “ आज माझ्या या कारवांमध्ये माझ्याबरोबर प्रवास करायला पहाटे साडेतीन वाजता पुण्याहून ठाण्यात आलेली ही मंडळी. शितल, मिहीर , गौरव, सिद्धार्थ I really admire your dedication and talent. thank you for the lovely outfit, pictures and video.", असंही मिलिंद गवळी यांनी पोस्टमध्ये लिहिलं.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: