Seema Ghogale: अभिनेत्री सीमा घोगले (Seema Ghogale)  यांनी 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte)  या मालिकेत विमल ही भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. सीमा घोगले  यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

Continues below advertisement


सीमा घोगले यांची पोस्ट


सीमा घोगले यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'आज 5 वर्ष झाली.  तुम्ही नाही आहात हे पचवणं अजूनही जड जातंय,पण मी ठिक आहे काळजी करू नका. शेवटच्या श्वासापर्यंत स्पर्धेचं सगळं नियोजन नीट झालंय ना ह्याची काळजी होती तुम्हाला तुमचा हा वारसा पुढे न्यायला थोडी कमी पडतेय मी, पण मी ठिक आहे काळजी करू नका.  माझ्या वाढदिवसाला, सणासुदीला १५ दिवस अगोदर खरेदीला पैसे द्यायचात तुम्ही,आता माझी मीच खरेदी करते पण मी ठिक आहे काळजी करू नका....माझ्या नाटकाचा प्रयोग कसा झाला, आज शूटिंगला किती सीन झाले किंवा तुमच्या स्वभावानुसार क्वचित कधीतरी छान झालं काम असं म्हणायचात आता तुमची ती दाद मिळत नाही, पण मी ठिक आहे काळजी करू नका....जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी घरी परत आल्यावर तुम्ही असायचात दार उघडायला आता कुलूप उघडून माझी मीच येते कारण दार उघडायला तुम्ही नाहीत, पण मी ठिक आहे काळजी करू नका.... एका मुलीसाठी सगळ्यात सुरक्षित जागा कुठली असेल तर तिच्या बाबांचं छत्र तिच्या डोक्यावर असणं तुम्ही गेलात, पण मी ठिक आहे काळजी करू नका....सीमा अनंत घोगळे म्हणून मी सगळ्या जबाबदाऱ्या चुकत माकत का होईना पार पाडल्या, ह्यापुढेही पाडेन तुम्ही फक्त सोबत रहा... आणि मी ठिक आहे खरंच काळजी करू नका. तुमची खूप आठवण येते.'






सीमा घोगले या सध्या "पिरतीचा वनवा उरी पेटला" या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या मालिकेत त्या कृष्णाई ही भूमिका साकारत आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Milind Gawali: "पहाटे साडेतीन वाजता पुण्याहून ठाण्यात...";'आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळींच्या पोस्टनं वेधलं लक्ष