Tejaswini Pandit: मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) काही दिवसांपूर्वी टोलसंदर्भात एक ट्वीट शेअर केले होते. तिच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले होते. तेजस्विनीच्या या ट्वीटनंतर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. टोलचे पैसे कुणाच्या खिशात जातात? असा प्रश्न तेजस्विनीनं तिच्या ट्वीटच्या माध्यमातून उपस्थित केला होता. आता ‘लोकमत फिल्मी’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तेजस्विनीनं तिच्या ट्वीटबाबत सांगितलं. तसेच तिनं या मुलाखतीमध्ये  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे देखील कौतुक केले आहे.

  


तेजस्विनी ट्वीटबाबत काय म्हणाली?


मुलाखतीमध्ये ट्वीटबाबत तेजस्विनी म्हणाली," जनतेचा एक भाग म्हणून मी ट्वीट करते. मला माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मला बोलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे जनतेचा एक भाग म्हणून मी बोलले.   सत्तेत असताना कोणी चुकत असेल किंवा  लोकांना ग्रँटेड घेत असेल तर जनता म्हणून मी बोलणारच आहे. मी बोललच पाहिजे कारण मी  मतदान करते. मला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. जर सरकार आपली कामे करत नाही तर आपण प्रश्न का  विचारायचे नाहीत? मी ट्रोलर्सला घाबरत नाही. मी जे बोलेल ते काही लोकांना आवडलं काही लोकांना नाही आवडलं. जनतेचा एक भाग म्हणून काही करायचं असेल, तर मी करणार आहे. "


तेजस्विनीनं केलं राज ठाकरे यांचं कौतुक


पुढे मुलाखतीमध्ये तेजस्विनी म्हणाली, "राज ठाकरे यांच्या वाढदिवसाला मी पोस्ट केली होती. मी आजही तेच सांगत आहे की, राज ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.  हे त्याचं दुर्दैव नाहीये. कारण कुठल्याही मराठी माणसाला कोणताही प्रोब्लेम असेल तर तो राज साहेबांकडे जातो. त्यांच्याबद्दल इतका विश्वास का वाटतो? कारण ते मराठी माणसासाठी काम करत आहेत. मला राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री झालेलं बघायचं आहे"






तेजस्विनीनं शेअर केलं होतं ट्वीट


 तेजस्विनीनं देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ शेअर केला. त्या व्हिडीओमध्ये दिसते की, देवेंद्र फडणवीस हे टोलच्या मुद्द्याबाबत बोलत आहेत.त्या व्हिडीओला तेजस्विनीनं कॅप्शन दिलं. "म्हणजे?  ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत ? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय ?  राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून !!  हे "माननीय उपमुख्यमंत्री" यांचे विधान कसे असू शकते? अविश्वसनीय! तुमचीही फसवणूक झाली असेल तर शेअर करा!" 


इतर महत्वाच्या बातम्या:


Rohit Pawar : टोलवरुन प्रश्न विचारणाऱ्या मराठी अभिनेत्रीचे सोशल अकाऊंट्स टार्गेट, ट्रोल गँग वापरुन किती खालची पातळी गाठणार, रोहित पवार आक्रमक