Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Rinku Rajguru: ‘झिम्मा 2’ नंतर रिंकू राजगुरु आणखी एका चित्रपटामधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला; फोटो शेअर करत म्हणाली, "हा चित्रपट माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे"
Rinku Rajguru: अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) ही सध्या तिच्या ‘झिम्मा 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'झिम्मा-2' हा चित्रपट 24 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. रिंकूच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. झिम्मा-2 या चित्रपटानंतर रिंकू ही आणखी एका चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील लूकचा फोटो शेअर करुन रिंकूनं या चित्रपटाचं नाव चाहत्यांना सांगितलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Bajind Song: 'इंद्रधनू नभामध्ये उधळतो रंग...'; 'बाजिंद' चित्रपटातील गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला, हंसराज आणि पूजाचा रोमँटिक अंदाज
Bajind Song: 'बाजिंद' (Bajind) या चित्रपटातील रोमँटिक शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याला संगीतप्रेमींची पसंती मिळत आहे. 8 डिसेंबर रोजी 'बाजिंद' संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Web Series On OTT: किसिंग सीन, इंटिमेट सीन्स आणि खतरनाक डायलॉग्स, बोल्डनेसच्या बाबतीत हिंदी वेब सीरिजला देखील मागे टाकतात 'या' मराठी वेब सीरिज
Web Series On OTT: ओटीटीवर (OTT) विविध विषयांवर आधारित असणाऱ्या वेब सीरिज (Web Series) रिलीज होत असतात. यामधील काही सीरिजमध्ये किसिंग सीन तसेच इंटिमेट सीन्स असतात. सध्या सर्रास अनेक वेब सीरिजमध्ये बोल्डनेस दाखवून प्रेक्षकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातो. अशा अनेक हिंदी वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. अशातच काही अशा मराठी वेब सीरिजबद्दल जाणून घेऊयात, ज्यामध्ये किसिंग सीन, इंटिमेट सीन्स आणि खतरनाक डायलॉग्स आहेत.
सविस्तर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
Kiran Mane: "आरक्षणाला समर्थन देताना परजातीला कमी लेखणे त्वरित थांबवा"; किरण मानेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष
Kiran Mane: अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाबद्दलच्या (Maratha Reservation) पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत आहेत. काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या पोस्टमध्ये किरण माने यांनी लिहिलं होतं, "जरांगे पाटील... या देशात एक सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो, हे तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.' आता आरक्षणाबद्दल आणखी एक पोस्ट किरण माने यांनी शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी मराठा बांधवांना सांगितलं आहे की, 'आरक्षणाला समर्थन देताना परजातीला कमी लेखणे त्वरित थांबवा'
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Ketaki Mategaonkar: "श्वासोच्छवासाचा त्रास, धुळीची अॅलर्जी आणि..."; मुंबईतील प्रदूषणाबाबत केतकी माटेगावकरची पोस्ट
Ketaki Mategaonkar: गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर (Ketaki Mategaonkar) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या अंकुश या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिनं रावी ही भूमिका साकारली. केतकी ही सोशल मीडियावर तिच्या चित्रपटांची माहिती देत असते. तसेच केतकी ही विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट देखील शेअर करते. केतकीनं नुकतीच मुंबईमधील प्रदूषणाबाबत (Mumbai Pollution) एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून केतकीनं महापालिकेकडे प्रदूषणाबाबत गांभीर्याने विचार करावा, अशी विनंती केली आहे.