Marathi Actress Krutika Gaikwad :  अनेक सेलिब्रिटी सध्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार आपल्या नव्या प्रोजेक्टची माहिती, काही कौटुंबिक क्षण आपल्या चाहत्यांसोबत शेअर करतात. काहीवेळेस आपल्या प्रकृतीची माहिती कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून देतात. सध्या एक मराठी अभिनेत्री एका आजाराचा सामना करत आहे. याची माहिती अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. 


अभिनेत्री कृतिका गायकवाडने ( Krutika Gaikwad) सोशल मीडियावर  एक पोस्ट शेअर करत आपल्या आजाराची माहिती दिली आहे.  कृतिकाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिचे पोट फुगलेलं दिसत आहे. आपण गरोदर नसून आपल्याला एक आजार झाला असल्याची माहिती तिने पोस्टद्वारे दिली आहे. 






गर्भाशयाशी संबंधित आजार...


कृतिकाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, मी गरोदर नाहीत तर, गर्भाशयाचे फायब्रॉइड्स आहेत. फायब्रॉइड्स  म्हणजे गर्भाशयातील  गाठ आहे. पण, ही गाठ कर्करोगाची नसल्याचेही तिने म्हटले. फायब्रॉइड असलेल्या सर्व महिलांमध्ये ही लक्षणे नसतात. ज्या स्त्रियांना लक्षणे दिसतात त्यांना सहसा फायब्रॉइड्ससह जगणे कठीण वाटते. काहींना वेदना होतात आणि मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होतो. यातील काही वाढ डोळ्यांनी पाहण्यास खूपच लहान आहेत असेही तिने आपल्या पोस्ट मध्ये म्हटले. 


 






आई होण्याच्या आनंदाला मुकण्याची शक्यता...


कृतिकाने म्हटले की, फायब्रॉइड मोठा झाल्याने तो गर्भाशयाचा तो आतील आणि बाहेरील भाग खराब करू शकतो. या गाठीमुळे तुम्ही आई होण्याच्या आनंदाला मुकू शकता. 


मित्रपरिवार-चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा... 


कृतिकाने आपल्या आजाराची माहिती दिल्यानंतर अनेकांनी तिच्या चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काहींनी तिला काळजी घेण्याचाही सल्ला दिला आहे.