Premachi Goshta Serial Update : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta)  मालिकेत सध्या सागरची भावनिक कोंडी झाल्याचे चित्र आहे. माधवीचा अपघात आदित्यमुळे झाला असल्याचे समजल्यानंतर सागर प्रचंड अस्वस्थ झाला आहे. आदित्यलाही काही होऊ द्यायचे नाही आणि मुक्तापासूनही काही लपवायचे नाही असे सागरला वाटते. सागरची मोठी भावनिक कोंडी झाली आहे. सागर आता काय निर्णय घेणार? मुक्ताला सत्य सांगणार का, याचा उलगडा येत्या काही एपिसोडमध्ये होईल. 


सागरला पुन्हा प्रेमात पाडण्यासाठी सावनीकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. आदित्य आणि मला वाचवण्यासाठी हे सगळं करत असल्याचे सावनी हर्षवर्धनला सांगते. मुक्ताला अपघाताचे खरं कारण कळलं आणि सागरने तिच्यापासून सत्य लपवलं असल्याचे समजताच मुक्ता त्याच्यावर चिडेल असे सावनी सांगते.


सागर-सावनीत होणार वाद


तणावात असलेल्या सागरला जेवण्याची इच्छा होत नसते. पण, सई-मुक्ताच्या हट्टामुळे तो जेवण्यासाठी तयार होतो. त्याच वेळी सागर सावनीला फोन करून आदित्यच्या प्रकृतीबाबत विचारपूस करतो. सावनी आणि सागर यांच्यात वाद होतो. आदित्यला तू आई म्हणून नीट संस्कार करू शकले नाहीस, त्याचमुळे त्याने कृत्य केले असल्याचे सागर सावनीला सुनावतो. आता, आपण जे काही घडलं आहे ते सगळं सांगणार असल्याचे सागर सावनीला सांगतो. त्यावर सावनी चिडते आणि आदित्यला पोलीस उचलून घेऊन जातील अशी भीती दाखवते.  त्यावर सावनी सागरला विनवणी करते. 


सागरचे खोटं बोलणं मुक्ता पकडणार


सावनीशी बोलत असताना मुक्ता मागे उभी आहे हे लक्षात येताच सागर फोन ठेवतो आणि मिहिरचा फोन असल्याचे सागर सांगतो. मात्र, मुक्ता सागरचे खोटं बोलणं पकडते. तुम्ही खोटं का बोललात असे सागरला विचारते. मुक्ताच्या बोलण्याने सागर घाबरतो. त्यावर मुक्ता तुम्ही आदित्यबाबत बोलत होते का, तुम्ही बोलू शकता. आदित्यचे तुम्ही आईबाबा आहात असे मुक्ता सागरला सांगते.


मुक्ताचा आपल्यावर किती विश्वास आहे. पण, आपण तिच्यापासून काही गोष्टी लपवून ठेवत आहे असे सागर मनात बोलतो. 


दोषीला माफ करण्याची माधवीची भूमिका


मुक्ता माधवीच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी घरी जाते. त्यावर मुक्ता आम्ही सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेण्यासाठी जात असल्याचे सांगते. त्यावर माधवी आता त्या दोषी कार चालकाला आपल्या कृत्याचा पश्चाताप होत असेल. तुम्ही इतका त्रास करून घेऊ नका असे माधवी सांगते. त्यावर मुक्ता त्यावर त्या कार चालकाला सोडणार नसल्याचे सांगते. दोषीला कठोर शिक्षा देणार असल्याचा निर्धार व्यक्त करते. 


सागर सीसीटीव्ही फूटेज घेण्यासाठी मुक्ताशिवाय जातो. मुक्ता सागरला घरात शोधत असते. अखेर ती सागरला फोन करते तेव्हा तो तिला अपघाताच्या दिवशीचे फूटेज नसल्याचे सांगतो. यावर मुक्ताला धक्काच बसतो. अपघात करणाऱ्या दोषीची माहिती नसल्याने ती चिंता व्यक्त करते.