Man Zhala Bajind : झी मराठीवरील नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली मालिका 'मन झालं बाजिंद' प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेवर आणि त्यातील व्यक्तिरेखांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. कृष्णा आणि राया ही जोडी देखील प्रेक्षकांची अगदी आवडती जोडी बनली आहे. मालिकेतील राया आणि कृष्णाच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे.
सालस कृष्णा आणि रांगडा राया प्रेक्षकांना भावले आहेत. रायाचा रांगडा लुक सगळ्यांच्या पसंतीस पडला असून त्याच्यासारखी स्टाईल त्याचे चाहते फॉलो करत आहेत. पण आता मालिकेत रायाचा वेगळा लुक लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. राया आता शॉर्ट हेअर लुक मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या लुक मधील त्याचा खास फोटो सध्या व्हायरल झाला आहे. मालिकेत नुकतंच राया आणि कृष्णाच लग्न झालेलं प्रेक्षकांनी पाहिलं आता लवकरच राया या नवीन अवतारात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
Mission Majnu Release Date: 'मिशन मजनू' 'या' दिवशी होणार प्रदर्शित, Siddharth malhotra चा हटके लूक
'मन झालं बाजिंद' मालिकेतील राया ही भूमिका साकारणारा अभिनेता वैभव चव्हाण नव्या लूकबद्दल म्हणाला, "मी या नवीन लूकसाठी खूपच जास्त एक्सायटेड आहे. मालिकेत खूप घडामोडी घडत आहेत. कृष्णा आणि रायाच लग्न झालं आहे आणि आता पुढे मालिकेत अजून काही ट्विस्ट्स अँड टर्न्स येणार आहेत. त्यामुळे रायाचा हा लूक का बदलला आहे हे प्रेक्षकांना लवकरच कळेल आणि रायाच्या या नवीन लूकवर देखील प्रेक्षक तेवढंच प्रेम करतील याची मला खात्री आहे."
Samantha Ruth Prabhu Instagram: नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटानंतर समंथाची पोस्ट; म्हणाली, 'मी योद्धा'
रायाचा हा नवीन लुक मधील फोटो पाहून प्रेक्षक देखील त्याच्या लुक चेंजबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतील यात शंकाच नाही.
Raj Kundra Social Media Delete : राज कुंद्राकडून सोशल मीडिया अकाऊंट्स डिलीट ; शिल्पाची पोस्ट चर्चेत