Samantha Ruth Prabhu Instagram: नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटानंतर समंथाची पोस्ट; म्हणाली, 'मी योद्धा '

अभिनेत्री समंथा अक्किनेनी (Samantha Akkineni) आणि नागा चैतन्य  (Naga Chaitanya) यांनी  काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाची माहिती दिली होती.

Continues below advertisement


Samantha Ruth Prabhu Instagram: अभिनेत्री समंथा अक्किनेनी (Samantha Akkineni) आणि नागा चैतन्य  (Naga Chaitanya) यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाची माहिती दिली होती.  पोस्टमध्ये त्यांनी वेगळं होण्याच्या निर्णयाबद्दल सांगितले होते. अनेकांनी त्यांच्या या पोस्टवर कमेंट्स केल्या होत्या. घटस्फोटानंतर समंथा चर्चेत होती. नुकतीच समंथाने एक पोस्ट तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली. या पोस्टमध्ये तिने 'मी योद्धा आहे' असं म्हणलंय. 

Continues below advertisement

सोशल मीडियवरील  समंथाची पोस्ट 
समांथाने सोशल मीडियावर एक कविता पोस्ट केली आहे. यामध्ये लिहीले आहे, 'मी मजबूत आहे, मी  पर्फेक्ट नाही, पण मी स्वत: चं पर्फेक्ट वर्जन आहे. मी प्रेमळ आहे. मी कधीच हार मानत नाही. मी एक माणूस आहे, मी एक योद्धा आहे.' ही प्रेरणा देणारी कविता समंथाने सोशल मीडियावर शेअर केली. काही दिवसांपूर्वी समंथाने तिच्या दुबई ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. एक रिपोर्टनुसार नुकतीच समंथा यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ  आणि बद्रीनाथ या चार धाम यात्रेला देखील गेली होती.  समंथा सोशल मीडियवर अॅक्टिव्ह असते वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. 

 

Raj Kundra Social Media Delete : राज कुंद्राकडून सोशल मीडिया अकाऊंट्स डिलीट ; शिल्पाची पोस्ट चर्चेत

 पोस्ट करून दिली होती घटस्फोटाबद्दल माहिती 
 समंथाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून तिच्या घटस्फोटाबद्दल चाहत्यांना सांगितले होते. पोस्टमध्ये समंथाने लिहीले होते, 'आमच्या सर्व हितचिंतकांसाठी.. खूप विचार केल्यानंतर, चैतन्य आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही पती-पत्नीसारखे आमचे मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्ही दहा वर्षांहून अधिक काळ मित्र आहोत जे आमच्या नात्याचा आधार होता. आमच्यात मैत्री कायम राहील. आम्ही आमच्या चाहत्यांना, हितचिंतकांना आणि माध्यमांना विनंती करतो की तुम्ही सर्वांनी आमच्या या कठीण काळात आम्हाला साथ द्या आणि आमच्या दोघांनाही पुढे जाण्यासाठी प्रायव्हसी द्या. तुमच्या सर्वांच्या समर्थनाबद्दल खूप आभार.'

Mission Majnu Release Date: 'मिशन मजनू' 'या' दिवशी होणार प्रदर्शित, Siddharth malhotra चा हटके लूक

 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola