Mission Majnu Release Date: सिद्धार्थ मल्होत्राचा (Siddharth malhotra) आगामी सिनेमा मिशन मजनू लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सिद्धार्थच्या चाहत्यांमध्ये आनंददायी वातावरण आहे. 'मिशन मजनू' 13 मे 2022 ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रासोबत रश्मिका मंदाना दिसून येणार आहे. 


सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth malhotra) आणि रश्मिका मंदानाच्या 'मिशन मजनू' सिनेमाचे पहिले पोस्टरदेखील समोर आले आहे. या पोस्टरमध्ये सिद्धर्थ मल्होत्रा फोनवर बोलताना दिसून येत आहे. या सिद्धार्थच्या हटके लूकमध्ये त्याच्या घरावर गंभीर भावनादेखील आहेत. या फोटवर सिद्धार्थने कॅप्शन लिहिली आहे,"पाकिस्तान विरोधातील भारताच्या सर्वात मोठ्या गुप्त ऑपरेशनचा एक भाग होण्यासाठी सज्ज व्हा".






Shahrukh Khan Birthday: वाढदिवशी 'शाहरुख' मुंबईबाहेर, 'मन्नत'वर चाहत्यांची तुडुंब गर्दी


13 मे 2022 रोजी प्रदर्शित होणारा 'मिशन मजनू' सत्य घटनेवर आधारित सिनेमा आहे. या सिनेमात सिद्धार्थ एका रॉ एजेंटच्या भूमिकेत दिसून येणार आहे. चित्रपटात अनेक थ्रिलर दाखवण्यात आले आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थ आणि रश्मिकाची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ आणि रश्मिका व्यतिरिक्त या चित्रपटात परमीत सेठी, शारिब हाशमी कुमुद मिश्रा आणि अनंत महादेवन दिसून येणार आहेत. 


Amazon Prime-Sajid Nadiadwala Deal : अ‍ॅमेझॉनसोबत साजिद नाडियाडवालाची 250 कोटीची डील; 'हे' पाच चित्रपट होणार प्रदर्शित


सिद्धार्थ मल्होत्रा नुकताच 'शेरशाह' चित्रपटात दिसला होता. या सिनेमातील सिद्धार्थची भूमिका चाहत्यांच्या पसंतीस पडली होती. 'मिशन मजनू' सिनेमातील सिद्धार्थची भूमिकादेखील प्रेक्षकांना नक्की आवडेल अशी आशा आहे.


Squad Trailer: रिनजिंक डेंजोंगपाचा पहिला सिनेमा 'स्क्वाड'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला