Raj Kundra Social Media Delete : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty)  सध्या पती राज कुंद्रामुळे (Raj Kundra) चर्चेत आहे. राज कुंद्राला जुलै महिन्यात अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी अटक झाली होती. सप्टेंबर महिन्यात त्याची जामिनावर सुटका झाली. जामिनावर सुटल्यानंतर राजने सोशल मीडिया अकाऊंट्स बंद करण्याचा निर्णय घेतला. राजची पत्नी शिल्पा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. नुकतीच तिने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. 






शिल्पाची सोशल मीडिया पोस्ट 
शिल्पाने सोशल मीडियावर 'वाइल्डरनेस ऑफ इंट्यूशन' या पुस्तकाच्या पानाचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये  एलन एल्डा(Alan Alda) यांनी लिहीलेले वाक्य दिसत आहे.  वाक्याचा अर्थ असा होतो की, 'तुम्ही आराम करण्याऐवजी  इंट्यूशनमध्ये गेलं पाहिजे. तिथे तुम्हाला जे मिळेल ते अद्भुत असेल. तिथे तुम्हाला स्वत:बद्दल  नवी गोष्ट कळेल.' या पुस्तकामध्ये  कंम्फर्ट झोनच्या बाहेर जाण्याबद्दल सांगितले आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाने सोशल मीडियावर त्याच्यासोबत कोणताही फोटो शेअर केला नाही. त्याआधी शिल्पा कुंटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत होती. 


Bigg Boss Marathi 3: नॉमिनेशन कार्यानंतर बिग बॉसच्या घरात पार पडणार 'डब्बा गुल' साप्ताहिक कार्य



काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी शर्लिन चोप्राविरोधात 50 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला होता.  राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीचे वकील प्रशांत पाटील यांनी शर्लिन चोप्राला नोटीस पाठवून एका आठवड्याच्या आत माफी मागण्यास सांगितले. निवेदनात म्हटले आहे की, 'शर्लिनने त्यांच्याविरोधात अपमानजनक टिप्पणी केली. जर शर्लिन चोप्राने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीची माफी मागितली नाही तर 50 कोटींचा मानहानीचा खटला आणि फौजदारी खटला राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी दाखल करणार आहेत.' शर्लिन चोप्रा हिने राज कुंद्रावर लैंगिक छळ आणि फसवणुकीचा आरोप करत मीडिया चॅनेल्सला मुलाखती दिल्या आहेत. 


Mission Majnu Release Date: 'मिशन मजनू' 'या' दिवशी होणार प्रदर्शित, Siddharth malhotra चा हटके लूक