Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेत सध्या अनेक अनपेक्षित वळणे येत आहेत. कार्तिक आणि सानिकाच्या लग्नाचं सत्य अखेर देशपांडे सरांसमोर आले आहे. त्यामुळे देशपांडे सरांना मोठा धक्का बसला आहे. 


कार्तिक आणि सानिकाने पळून जाऊन लग्न केल्याने इंद्रा-दीपूच्या अडचणींत वाढ होत आहे. मालिकेच्या आगामी भागात देशपांडे सर सानिकाच्या जुन्या आठवणींना उजाळा देणार आहेत. तर दुसरीकडे इंद्राची आई दीपिकासाठी लग्नाची मागणी घालायला देशपांडे सरांच्या घरी जाणार आहे.





इंद्रादेखील सानिकाची जबाबदारी घेण्यासाठी कार्तिकला भाग पाडताना दिसणार आहे. 'मन उडू उडू झालं' मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दिपूची भूमिका साकारत आहे. तर अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दिपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. सोशल मीडियावरदेखील त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. 


संबंधित बातम्या


Dasvi : तुरुंगात अभ्यास करणं हा माझा शैक्षणिक हक्क! अभिषेक बच्चनचा 'दसवीं' सिनेमा नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित


Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत प्रेमाची होळी साजरी होणार, यश-नेहाचं प्रेम फुलणार


Kapil Sharma Show : 'तो परत आला तर, मी निघून जाईन!', अर्चना पूरण सिंह कपिल शर्मावर कडाडली!


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha