Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिका सध्या अनपेक्षित वळणे घेत आहे. मालिकेच्या आगामी भागात सानिका आई होणार असल्याचे सत्य देशपांडे सरांना सांगणार आहे. 


देशपांडे सर आणि इंद्राच्या आईला सानिकाच्या अयोग्य वर्तनाचा चांगलाच धक्का बसणार आहे. सानिका खरचं आई होणार आहे की ती नाटक करत आहे हे प्रेक्षकांना आगामी भागात कळणार आहे. तर देशपांडे सर आणि जयश्री कार्तिकला चांगलीच शिक्षा देताना दिसणार आहेत.





सानिका आई होणार असल्याचे देशपांडे सरांना समजले तर त्यांची प्रतिक्रिया काय असेल याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आगामी भागात चांगलाच गोंधळ झालेला पाहायला मिळणार आहे. 'मन उडू उडू झालं' मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दिपूची भूमिका साकारत आहे. तर अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दिपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. 


संबंधित बातम्या


The Kashmir Files Box Office Collection Day 5 : बिग बजेट चित्रपटांना मागे टाकत काश्मीर फाईल्सची बॉक्स ऑफिसवर जादू कायम;  पाचव्या दिवसाची कमाई माहितीये?


Heropanti 2 : ‘बबलू’ बनून टायगर श्रॉफ दाखवणार हीरोपंती! ‘या’ दिवशी रिलीज होणार धमाकेदार ट्रेलर


Vishal Nikam : ‘आई मायेचं कवच’मध्ये 'मानसिंग’ची एण्ट्री, ‘बिग बॉस मराठी 3’ फेम विशाल निकम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला!


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha