Shreya Bugade : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugade) तिच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकींची नेहमी मनं जिंकते. श्रेया चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. या कार्यक्रमामधील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. नुकतीच बच्चन पांडे (Bachchan Pandey)च्या टीमनं चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. अक्षय, क्रितीनं यवेळी 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) च्या कलाकारांसोबत मजा, मस्ती केली.  नुकताच श्रेयानं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओला तिनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. 


श्रेयानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की, श्रेया अक्षयसोबत संवाद साधत आहे. या व्हिडीओला श्रेयानं कॅप्शन दिलं, 'हा देशातील सर्वात प्रसिद्ध अभिनेता आहे. या अभिनेत्याला मी लहानपणापासून पाहात आहे.  यांचे चित्रपट मी पाहिले आहेत. अक्षय कुमार तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल मी तुमचे आभार मानते. '






श्रेयानं शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. सलील कुलकर्णीनं, मला तुझा अभिमान वाटतो अशी कमेंट केली. तर, सोनाली खरेनं, क्या बात है अशी कमेंट केली. तसेच स्वप्नील जोशी आणि  अभिजीत खांडकेकर यांनी देखील श्रेयाच्या या व्हिडीओला कमेंट करून तिचं कौतुक केलं आहे. 


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha