Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत आता एक ट्विस्ट येणार आहे. इंद्रा-दीपूच्या प्रेमाचे सत्य अखेर देशपांडेसमोर येणार आहे. आज मालिकेचा एक तासाचा विशेष भाग रंगणार आहे. या विशेष भागात इंद्रा राडा नाही तर तांडव घालताना दिसणार आहे. 


इंद्रा राडा नाही तर तांडव घालणार!


'मन उडू उडू झालं' मालिकेचा विशेष भाग सायंकाळी सात वाजता होणार आहे. या विशेष भागात इंद्रा-दीपूचे सत्य प्रेक्षकांसमोर येणार आहे. या विशेष भागात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी पाहायला मिळणार आहे. पण इंद्रा गुंड असल्याचे सत्य देशपांडे सरांना सजल्यावर इंद्रा-दीपूच्या नात्यावर त्याचा वाईट परिणाम होणार आहे. इंद्राच्या गुंड रुपाचा स्वीकार देशपांडे सर करतील का, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 


दीपिकाची प्रकृती सुधारली असून ती आता बॅंकेत जायला सुरुवात करणार आहे. पण कार्तिक आणि सोनटक्केला दीपिका बॅंकेत नकू आहे. त्यामुळे त्यांनी इंद्रा-दीपूला त्रास द्यायचा प्लॅन केला आहे. पण या प्लॅनचा फटका इंद्रा-दीपूला बसणार आहे. इंद्राला आता देशपांडे सरांची समजूत घालावी लागणार आहे. 






'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका तरुणांच्या पसंतीस उतरते. मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दीपूची भूमिका साकारत आहे. तर अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दीपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या दोघांचा चाहतावर्गदेखील मोठा आहे. हृता दुर्गुळे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.


संबंधित बातम्या


Man Udu Udu Zhala : इंद्रा-दीपूच्या प्रेमाचे सत्य देशपांडे सरांसमोर उघडकीस; सानिका टाकणार मिठाचा खडा


Man Udu Udu Zhala : दीपू कोमातून बाहेर येण्यासाठी इंद्रा देणार अग्निपरीक्षा; रंगणार एक तासाचा विशेष भाग