Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळीच पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत या मालिकेतील अनेक महत्त्वाच्या कलाकारांनी मालिकेचा निरोप घेतला आहे. मात्र, यातील एक महत्त्वाचे पात्र आता मालिकेमध्ये परतणार आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत आता ‘दया बेन’ची एन्ट्री होणार आहे. ‘दया बेन’च्या एन्ट्रीवर आता ‘जेठालाल’ची प्रतिक्रिया आली आहे.


अनेक वर्षांपासून चाहते दयाबेनच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. दयाबेनच्या व्यक्तिरेखेबद्दल दररोज वेगवेगळ्या चर्चा सुरु असतात. कधी दिशा वाकाणीच्या पुनरागमनाची बातमी येते, तर कधी दयाबेनच्या व्यक्तिरेखेसाठी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड करण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र, दिशा वाकाणी आता परतणार नसल्याचे मेकर्सनी स्पष्ट केले आहे. यावर आता ‘जेठालाल’ साकारणाऱ्या दिलीप जोशी यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे.


आता अच्छे दिन येणार!


एका मुलाखतीत दिलीप जोशी म्हणाले की, असित भाईंना नेमके काय हवे आहे, हे मला माहीत नाही. ते म्हणाले की, दयाच्या येण्याने आता जेठालाललाही ‘अच्छे दिन’ पाहायला मिळतील, अशी आशा आहे. यानंतर दिलीप जोशी यांनी दिशा वाकाणीचे तोंडभरून कौतुक केले आणि सांगितले की, मी दिशासोबत 10 वर्षे काम केले आहे. पहिल्या दिवसापासून आमच्या केमिस्ट्रीला चांगला प्रतिसाद मिळाला होता.


‘या’ अभिनेत्रीला झाली विचारणा!


प्रेक्षकांची सर्वात आवडती व्यक्तिरेखा 'दयाबेन' चार वर्षांनंतर या शोमध्ये दिसणार आहे. या भूमिकेसाठी मेकर्स अनेक अभिनेत्रींची ऑडिशन घेत असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता दयाबेनच्या व्यक्तिरेखेसाठी एक नवीन नाव पुढे येत आहे. सगळ्या गोष्टी ठरल्या तर, लवकरच ‘ही’ अभिनेत्री ‘दया बेन’ साकारताना दिसू शकते.


90च्या दशकातील हिट मालिका 'हम पांच' मधील पात्र ‘स्वीटी माथूर’ साकारून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री राखी विजान हिला ‘दयाबेन’च्या भूमिकेसाठी निवडण्यात आल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले गेले आहे. निर्माते असित कुमार मोदी यांनी अलीकडेच मीडियाला या संदर्भात माहिती देताना सांगितले की, प्रसिद्ध पात्र ‘दया भाभी’ लवकरच कथेत परत येणार आहे. परंतु 'दयाबेन' ची भूमिका करणारी दिशा वाकाणी परतणार नाही. तिच्या ऐवजी दुसरी अभिनेत्री यात दिसेल. दरम्यान, आता एका सूत्राने सांगितले की, 'दयाबेनची भूमिका करण्यासाठी राखी विजानला संपर्क करण्यात आला आहे. राखी ही सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा कॉमिक टायमिंग चांगला आहे. म्हणूनच या भूमिकेसाठी तिचा विचार करण्यात येत आहे.’


हेही वाचा :


Shailesh Lodha : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सोडल्यानंतर ‘या’ कार्यक्रमात दिसणार शैलेश लोढा, प्रोमो व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला!


TMKOC : ‘अरेच्चा! हे तर मला माहितच नव्हतं!’, शैलेश लोढांच्या शो सोडण्याच्या चर्चेवर ‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांची पहिली प्रतिक्रिया