Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत आता एक ट्विस्ट येणार आहे. मालिकेत सध्या दीपूचा गंभीर अपघात झाला आहे.सानिकाचा हट्टीपणा दीपूच्या जीवावर बेतला आहे. पण मालिकेच्या आगामी भागात दीपू कोमातून बाहेर येणार आहे. दीपू कोमातून बाहेर येण्यासाठी इंद्रा अग्निपरीक्षा देणार आहे. 


रंगणार एक तासाचा विशेष भाग


दीपू कोमातून बाहेर येण्यासाठी 'मन उडू उडू झालं' मालिकेच्या आगामी भागात इंद्रा अग्निपरीक्षा देणार आहे. नयनचा इंद्रावर हल्ला करण्याचा डाव यशस्वी होईल का? याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 'मन उडू उडू झालं' मालिकेचा आज एक तासाचा विशेष भाग होणार आहे. रविवारी झी मराठीवर संध्याकाळी सात वाजता हा महाएपिसोड होणार आहे. 


सानिकामुळे दीपूचा अपघात झाल्याचे सत्य अखेर आले देशपांडे सरांसमोर


सानिकामुळे दीपूचा अपघात झाल्याचे सत्य अखेर देशपांडे सरांसमोर आले आहे. कार्तिकने देशपांडे सरांना दीपूचा अपघात झाल्याचे सत्य अखेर सांगितले आहे. सानिकाच्या वागणूकीमुळे देशपांडे सर आणि दीपूच्या आईला मोठा धक्का बसला आहे. आता सानिका आणि कार्तिकला इंद्राची आई घरात घेणार का, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 


'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका तरुणांच्या पसंतीस उतरते. मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दीपूची भूमिका साकारत आहे. तर अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दीपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या दोघांचा चाहतावर्गदेखील मोठा आहे. हृता दुर्गुळे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.


हृताने मालिकेच्या शूटिंगला केली सुरुवात


हृता दुर्गुळे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. लग्नानंतर हृता परदेशी फिरायला गेली होती. पण आता ती फॉरेन टूरवरून परत आली आहे. तसेच तिने 'मन उडू उडू झालं' मालिकेच्या शूटिंगला पुन्हा सुरुवात केली आहे. त्यामुळे मालिकेत हृता आता कोमातून बाहेर आलेली दिसणार आहे. 


संबंधित बातम्या


Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' मालिकेत नवा ट्विस्ट; दीपू येणार कोमातून बाहेर


Man Udu Udu Zhala : कार्तिक सोडणार सानिकाची साथ; दिपूची अवस्था पाहून इंद्रा स्वतःला सावरू शकेल?