Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत सानिकाने पळून जाऊन लग्न केल्याने तसेच ती लवकरच आई होणार असल्याने समाज देशपांडे सरांना अनेक प्रश्न विचारतो आहे. या सगळ्याचा परिणाम देशपांडे सरांच्या तब्येतीवर होत आहे. 


देशपांडे सरांची प्रकृती खालावल्याने दीपू इंद्राला घरी बोलवते. त्यानंतर इंद्रा देशपांडे सरांना रुग्णालयात घेऊन जातो. अशाप्रकारे इंद्रा दीपूच्या मदतीला धाऊन जाणार आहे. प्रोमोमध्ये दीपूची आई सानिकाला म्हणते, देशपांडे सरांना काही झालं तर मी तुला सोडणार नाही. या सगळ्या प्रकरणामुळे सानिका घाबरते.





देशपांडे सरांची प्रकृती खालावल्यानंतर सानिका देशपांडे सर आणि कुटुंबियांना आई होणार नसल्याचे सत्य सांगणार का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 'मन उडू उडू झालं' मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दिपूची भूमिका साकारत आहे. तर अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दिपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. 


संबंधित बातम्या


#BoycottRRRinKarnataka : कर्नाटकात ‘आरआरआर’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?


The Kashmir Files : ‘बिग बजेट’ चित्रपटांवरही भारी पडला ‘द कश्मीर फाइल्स’, तरीही विवेक अग्निहोत्रींना ‘या’ गोष्टीची खंत!


Dasvi Trailer : अभिषेक बच्चन राजकारणी तर यामीचा हटके अंदाज; दसवीचा धमाकेदार ट्रेलर रिलीज


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha