Dasvi Trailer : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) च्या दसवी (Dasvi) या चित्रपटाची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट पाहात होते. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमधील अभिषेकच्या हटके अंदाजाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 


दसवी या चित्रपटामध्ये अभिषेक राजकिय नेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. गंगाराम चौधरी हा नेता दहावीची परिक्षा देण्याचा निर्णय घेतो. त्यानंतर त्याच्या आयुष्यात कोण-कोणत्या घटना घडतात, हे या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे. चित्रपटात अभिषेक बच्चनसोबतच यामी गौतम (Yami Gautam) आणि निम्रत कौर (Nimrat Kaur) या अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारणार आहेत. ट्रेलरमधील अभिषेकच्या डायलॉग्सला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.  




दसवी हा चित्रपट 7 एप्रिल 2022 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार जलोटा यांनी केले आहेत. हा चित्रपट जियो सिनेमा आणि नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे. माय केक फिल्म यांनी या चित्रपटाची निर्मीती केली आहे. 


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha