Sunil Grover : अभिनेता सुनील ग्रोव्हर (Sunil Grover) गेल्या काही काळापासून सतत चर्चेत असतो. गेल्या महिन्यात हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सुनीलच्या चाहत्यांना त्याच्या प्रकृतीची चिंता सतावू लागली होती. हृदयविकाराच्या झटक्यामुळे अभिनेत्यावर मुंबईत मोठी शस्त्रक्रियाही झाली होती. तर, सुनीलला 3 फेब्रुवारीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मीडिया रिपोर्टनुसार, सुनील आता लवकरच कामावर परतणार आहे. अभिनेता आजपासून पूर्णवेळ काम करताना दिसणार आहे.


अभिनेता सुनील ग्रोव्हर ऋषिकेशमध्ये एका प्रोजेक्टचं शूटिंग पूर्ण करणार असल्याचं सांगितलं जात आहे. हृदयविकाराचा झटका आल्यापासून 44 वर्षीय सुनील त्याच्या तब्येतीबाबत खूप सावध झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता फक्त हेल्दी डाएटच घेत नाहीये, तर त्याच्या दैनंदिन दिनचर्येत त्याने योगाचाही समावेश केला आहे. सुनीलही कामावर जाण्यासाठी खूप उत्सुक असल्याचे सांगण्यात येत आहे.


एक-दोन नव्हे चार बायपास सर्जरी!


सुनील ग्रोव्हरवर एक नव्हे, तर चार बायपास सर्जरी झाल्या होत्या. सुनील ग्रोव्हरची काळजी घेण्यासाठी खुद्द सलमान खाननेही त्याच्या खास डॉक्टरांची टीम पाठवली होती. सुनील ग्रोव्हर हा अभिनेता सलमान खानच्या जवळच्या मित्रांपैकी एक आहे आणि कॉमेडियनच्या आजारपणाची माहिती मिळताच सलमान खान खूप काळजीत पडला होता.


सलमान खान आणि सुनील ग्रोव्हर यांनी ‘भारत’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्याच वेळी, सुनील ग्रोव्हर काही वेळापूर्वी प्रदर्शित झालेल्या 'तांडव' या वेब सीरीजमध्येही दिसला आहे. या मालिकेतील सुनीलच्या कामाचे खूप कौतुक झाले होते.


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha