Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. सध्या मालिकेत आनंदी-आनंद पाहायला मिळत आहे. इंद्रा-दीपू नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. तर कार्तिकने आता सुधारण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नानंतर इंद्रा-दीपू बॅंकेत पहिल्यांदाच गेल्याने त्यांचे दिमाखात स्वागत करण्यात आले आहे. 


इंद्रा-दीपूला सोनटक्केने दिला बेस्ट कपलचा पुरस्कार


'मन उडू उडू झालं' मालिकेत इंद्रा-दीपूने लग्नानंतर आता बॅंकेत जायला सुरुवात केली आहे. इंद्रा-दीपू पुन्हा एकदा बॅंकेत आल्याने बॅंकेतील कर्मचाऱ्यांना खूप आनंद झाला आहे. त्यांनी बॅंकेतील कर्मचाऱ्यांचे दिमाखात स्वागत केलं आहे. तसेच सोनटक्केने इंद्रा-दीपूला बेस्ट कपलचा पुरस्कार दिला आहे. इंद्राच्या आईनेदेखील इंद्राला शर्ट आणि दीपूला साडी भेट म्हणून दिली आहे. 


कार्तिक करणार नव्याने सुरुवात 


देशपांडे सरांनी कार्तिकला सुधारण्याची एक संधी दिली आहे. त्यामुळे कार्तिक आता नव्याने सुरुवात करणार आहे. कंपनीचे कागदपत्रं, गाडीची चावी या सगळ्या गोष्टींवर इंद्राचा हक्क असल्याने कार्तिक त्या सर्व गोष्टी इंद्राला देतो. तसेच पुढे कोणत्याही कारस्थानात सानिकाला मदत न करण्याचे ठरवतो. कार्तिकचं हे बदललेलं रूप पाहून सर्वांनाच आनंद झाला आहे. 


'मन उडू उडू झालं' घेणार प्रेक्षकांचा निरोप


'मन उडू उडू झालं' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून आता या मालिकेच्या जागी 'तू चाल पुढं' ही मालिका सुरू होणार आहे. ही मालिका 15 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत दीपा परब प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. गृहिणीच्या आयुष्यावर भाष्य करणारी ही मालिका असून या मालिकेच्या माध्यमातून दीपा परब छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. 


संबंधित बातम्या


Man Udu Udu Zhala : देशपांडे सरांनी कार्तिकला दिली सुधारण्याची संधी; बेबूने मागितली इंद्राची माफी


Man Udu Udu Zhala : कार्तिकचा खेळ खल्लास; पैसे चोरल्याचं सत्य आलं देशपांडे सरांसमोर