Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) या मालिकेत सध्या नव-नवीन ट्विस्ट येत असून सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत इंद्रा-दीपू नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. इंद्रा-दीपूच्या लग्नसोहळ्यादरम्यान कार्तिकने देशपांडे सरांच्या घरी जाऊन चोरी केली आहे. आता कार्तिकने चोरी केल्याचे सत्य देशपांडे सरांसमोर आलं आहे.


कार्तिकला कंपनीच्या कामासाठी 10 लाखांची गरज होती. देशपांडे सरांच्या घरी 10 लाख असल्याचे कार्तिकला माहीत होते. त्यामुळेच त्याने देशपांडे सरांच्या घरी जाऊन चोरी केली. घरी चोरी झाल्यामुळे देशपांडे सरांना खूप त्रास झाला होता. पण आता ही चोरी कार्तिकने केल्याचे सत्य देशपांडेसरांसमोर आलं आहे. सत्य समजल्यानंतर देशपांडे सरांना मोठा धक्का बसला आहे. 






'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका तरुणांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दीपूची भूमिका साकारत आहे. तर अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दीपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या दोघांचा चाहतावर्गदेखील मोठा आहे. हृता दुर्गुळे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.


'मन उडू उडू झालं' जागी 'तू चाल पुढं' होणार सुरू


'मन उडू उडू झालं' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून आता या मालिकेच्या जागी 'तू चाल पुढं' ही मालिका सुरू होणार आहे. ही मालिका 15 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत दीपा परब प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. गृहिणीच्या आयुष्यावर भाष्य करणारी ही मालिका असून या मालिकेच्या माध्यमातून दीपा परब छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. 


संबंधित बातम्या


Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; चाहते नाराज


Man Udu Udu Zhala : प्रतीकच्या परवानगीने इंद्रा करणार दीपूसोबत लग्न; लवकरच होणार शूटिंगला सुरुवात