Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सानिका आणि कार्तिकने पळून जाऊन लग्न केल्याचा परिणाम देशपांडे सरांच्या तब्येतीवर होत आहे. देशपांडे सरांची प्रकृती सुधारत असल्याने मालिकेत आता होळी विशेष भाग रंगणार आहे. 


'मन उडू उडू झालं' मालिकेचा प्रोमो नुकताच आऊट झाला आहे. प्रोमोमध्ये इंद्रा म्हणतो आहे,"बाबा गेल्यापासून माझं आयुष्य बेरंग झालं आहे". यावर दीपू म्हणते,"तुम्ही माझ्या आयुष्यातला रंग आहात. त्यामुळे मी तुमचं आयुष्य बेरंग होऊ देणार नाही". तसेच ती इंद्राच्या चेहऱ्याला रंगदेखील लावते.





देशपांडे सरांना रुग्णालयात दाखल केल्याने इंद्रा दीपूच्या मदतीला धाऊन आला आहे. 'मन उडू उडू झालं' मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दिपूची भूमिका साकारत आहे. तर अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दिपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. 


संबंधित बातम्या


The Kashmir Files : 'भोपाळी म्हणजे समलैंगिक', विवेक अग्निहोत्री यांचं वक्तव्य; दिग्विजय सिंह म्हणाले, 'संगतीचा परिणाम...'


Chandramukhi : ‘चंद्रमुखी’ म्हटलं नि अमृताचंच नाव डोळ्यापुढे आलं! प्रसाद ओकने दिला चर्चांना पूर्णविराम!


RRR Box Office Collection Day 1: जगभरातील बॉक्स ऑफिसवर RRR ची जादू; पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन माहितीये?


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha