RRR Box Office Collection Day 1 : एस. एस राजामौली (SS Rajamouli) यांचा आरआरआर (RRR) हा चित्रपट काल (25 मार्च) प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जाणून घ्या आरआरआर चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन...
बाहुबलीनंतर RRR या एस.एस राजामौली यांच्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. रिपोर्टनुसार या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 18 कोटींची कमाई केली आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शच्या रिपोर्टनुसार, केवळ भारतातच नाही तर अमेरिका, कॅनडा आणि USA या देशांमध्ये देखील हा चित्रपट चांगली कमाई करत आहे. युनायटेड किंगडममध्ये या चित्रपटानं 2.40 कोटींची कमाई केली आहे.
प्री- बुकिंग आणि राइट्सच्या माध्यामातून कोट्यवधींची कमाईआरआरआर चित्रपटाच्या निर्मात्यांनी 22 मार्चपासून प्री बुकिंगची सुरूवात केली. प्री- बुकिंग आणि राइट्सच्या माध्यामातून या चित्रपटानं रिलीज होण्यापूर्वीच 750 कोटींची कमाई केली. रिपोर्टनुसार, या चित्रपटाचा सर्व भाषांमधील प्री-रिलीज थियेट्रिकल बिजनेस हा 520 कोटी आहे.
स्टार कास्ट एसएस राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटानं आलिया भट्ट, अजय देवगन , ज्युनियर एनटीआर आणि राम चरण या जबरदस्त स्टार कास्टनं केले आहे.
हेही वाचा :
- RRR Movie Leak Online : 350 कोटींचं बजेट, रिलीजच्या पहिल्याच दिवशी ‘RRR’ चित्रपट ऑनलाईन लीक!
- आराध्या बच्चनचा ‘स्कूल युनिफॉर्म’मधील फोटो सोशल मीडियावर चर्चेत!
- Video : अनुष्काच्या एका कृतीमुळे विराट कोहलीचा जुगाड गेला वाया! व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha