Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत आता एक ट्विस्ट येणार आहे. दीपू-इंद्राच्या प्रेमाचं सत्य सध्या फक्त दीपूच्या आणि इंद्राच्या आईलाच माहित आहे. पण आता हे सत्य सानिका आणि कार्तिकसमोर येणार का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 


इंद्राच्या आयुष्यात कोणीतही मुलगी असल्याचा संशय सानिका आणि कार्तिकला आला आहे. सानिकाला इंद्रा आणि दीपूच्या प्रेमाचं सत्य कळालं तर सानिका त्यांचं नातं स्वीकारेल का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. अशातच इंद्रा आणि दीपू अनेकदा एकमेकांची बाजू घेताना सानिकाने पाहिले आहे. इंद्राच्या कपाटातदेखील सानिकाला दीपूची ओढणी मिळाली आहे. 


दीपू आणि इंद्राच्या प्रेमाला आता दीपूच्या आईनेदेखील मान्यता दिली आहे. पण हे सत्य देशपांडे सरांना समजल्यानंतर ते त्यांचं नातं स्वीकारतील का? अशातच इंद्रा म्हणजेच साळगावकार आहे हे कळल्यानंतर देशपांडे सर काय प्रतिक्रिया देणार हे प्रेक्षकांना लवकरच 'मन उडू उडू झालं' मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे. 


दीपू आणि इंद्राच्या प्रेमाचा स्वीकार करण्यास आईने नकार दिला होता. दरम्यान शलाकाची तिच्या नवऱ्यापासून सुटका करत इंद्रा तिला देशपांडे सरांच्या घरी राहायला घेऊन आला.  त्यामुळे दीपूच्या आईने इंद्राला घरी बोलवले होते. तसेच त्याच्यासाठी खास बेतदेखील केला होता.





सानिकाचं खोटं नाटक दीपू सांगणार इंद्राला


देशपांडे सरांनी सानिकाच्या चोरओटीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमादरम्यान दीपू खूपच नाराज असते. दरम्यान ती इंद्राला सानिका आई होण्याचं नाटक करत असल्याचे सांगते. सानिकाचं हे खोटं नाटक सर्वांसमोर आल्यानंतर कार्तिक आणि सानिकाचं नातं तुटणार, असा अंदाज वर्तवला जात आहे. 


'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका तरुणांच्या पसंतीस उतरते. मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दीपूची भूमिका साकारत आहे. तर अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दीपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या दोघांचा चाहतावर्गदेखील मोठा आहे.


संबंधित बातम्या


Man Udu Udu Zhala : शलाकाने केली कमाल; उघडले आईचे डोळे


Man Udu Udu Zhala : इंद्रा शलाकाला वाचवण्यात यशस्वी; दीपूसमोर आलं सत्य


Hruta Durgule : 'मन उडू उडू झालं' मालिकेतून दीपूने घेतला निरोप? हृता दुर्गुळेने एबीपी माझाला दिली माहिती