Hruta Durgule : हृता दुर्गुळेला (Hruta Durgule) महाराष्ट्राची क्रश असे म्हटले जाते. फुलपाखरू मालिकेने हृताला ओळख मिळवून दिली. सध्या हृता 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zal) या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान हृता दुर्गुळेने मालिकेतून निरोप घेतला आहे, असे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


हृता दुर्गुळेने एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे, 'मन उडू उडू झालं' ही मालिका मी सोडलेली नाही. या केवळ अफवा आहेत. सध्या मी मालिकेचे शूटिंग करत आहे. कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका". लग्नबंधनात अडकणार असल्याने, नाटकांच्या प्रयोगामुळे, सेटवरील अस्वच्छतेमुळे, 'अनन्या' सिनेमाच्या प्रमोशनसाठी हृताने मालिका सोडली असं म्हटलं जात होतं. पण या कोणत्याही कारणाने हृताने मालिका सोडलेली नाही.





हृता दुर्गुळेचा बॉयफ्रेंड प्रतिक शाहसोबत 24 डिसेंबर रोजी साखरपुडा झाला होता. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने प्रतिक शाहला डेट करत असल्याची कबुली दिली होती. हृताची 'मन उडू उडू झालं' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तिच्या 'दादा एक गूड न्यूज आहे' नाटकाचे रंगभूमीवर जोरदार प्रयोग सुरू आहेत. लवकरच तिचा अनन्या सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  


संबंधित बातम्या


Majhi Tujhi Reshimgath : परी यशला सांगणार सिम्मीचं कारस्थान; बंडू काका पुन्हा येणार पॅलेसवर


Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’च्या टीमचा क्रिकेट सामना; टीम अनिरुद्ध आणि संजनामध्ये रंगली अंतिम लढत


Vasantrao Deshpande Birth Anniversary : बालपणापासून गाण्याची आवड, वयाच्या आठव्या वर्षी चित्रपटात काम! वाचा पंडित वसंतराव देशपांडे यांच्याबद्दल..