Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत सध्या नव-नविन ट्विस्ट येत आहेत. इंद्राचं सत्य देशपांडे सरांसमोर आल्यानंतर मालिकेत एक वेगळचं वळण आलं आहे. इंद्राने गुंडागिरी सोडून चांगल काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मालिकेत लवकरच प्रेक्षकांना इंद्रा-दीपूला लग्नसोहळा पाहायला मिळणार आहे. 

Continues below advertisement


नुकत्याच एक वेबपोर्टलला दिलेल्या मुलाखतीत इंद्रा म्हणाला, 'मन उडू उडू झालं' मालिकेत लवकरच  इंद्रा आणि दीपूचा लग्नसोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. येत्या काही दिवसांत लग्नसोहळ्याच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. पण प्रतीकच्या परवानगीने इंद्रा दीपूसोबत लग्नबंधनात अडकणार आहे". 






इंद्राचे सत्य देशपांडे सरांसमोर आल्यानंतर मालिकेत एक वेगळचं वळण आलं आहे. इंद्राने गुंडागिरी सोडून चांगलं काम करण्याचा निर्णय घेतला आहे. पण समाज इंद्राला स्वीकारायला तयार नाही. देशपांडे सरांनी इंद्राला एका आठवड्याची मुदत दिली आहे. एका आठवड्यात इंद्रा सुधारला तर देशपांडे सर इंद्रा आणि दीपूच्या नात्याला मान्यता देणार आहेत. त्यामुळेच इंद्राने धडपड सुरू केली आहे.


'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका तरुणांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दीपूची भूमिका साकारत आहे. तर अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दीपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या दोघांचा चाहतावर्गदेखील मोठा आहे. हृता दुर्गुळे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.


संबंधित बातम्या


Man Udu Udu Zhala : गुंडागिरी सोडून इंद्रा करणार चांगल्या कामाला सुरुवात; समाज स्वीकारणार का?


Man Udu Udu Zhala : इंद्रा करणार त्याच्याच ऑफिसमध्ये नोकरी; कार्तिक घेणार मुलाखत