Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत दीपू आणि इंद्राच्या प्रेमाचे सत्य देशपांडे सरांसमोर आले असून आता मालिकेत एक नवा ट्विस्ट येणार आहे. इंद्राचे गुंडागिरीचे सत्य समजल्यानंतर देशपांडे सर आणि जयश्रीला मोठा धक्का बसला होता. पण आता गुंडागिरी सोडुन चांगल्या कामाला सुरुवात करणार आहे. 


गुंडागिरीचं काम इंद्रा थांबवणार 


इंद्रा गुंडागिरीचं काम करत असल्याचे सत्य अखेर देशपांडे सर जयश्रीसमोर आलं आहे. त्यामुळे त्या दोघांना मोठा धक्का बसला आहे. याचे इंद्राला खूप वाईट वाटले आहे. पण जयश्रीने इंद्राची बाजू समजूत घेत त्याला माफ केलं आहे. त्यामुळे इंद्रा आता गुंडागिरी थांबवून चांगलं काम करण्याचा निर्णय घेणार आहे. 






देशपांडे सरांचे शब्द इंद्राच्या जिव्हारी लागतात. 


देशपांडे सरांनी इंद्रा-दीपूचे प्रेम मान्य करण्यास नकार दिला आहे. शलाकाच्या सासरच्यांनी देशपांडे सरांना घरी येऊन धमकावण्याचा प्रयत्न केला. तसेच इंद्राने चार-चौघांत त्यांच्या तोंडावर काळ फासलं आणि मारहाण केली. त्यामुळे देशपांडे सरांना राग अनावर झाला आहे. त्यामुळे देशपांडे सर इंद्राला चांगलेच रागवतात. या सगळ्यामुळे देशपांडे सरांचे शब्द इंद्राच्या जिव्हारी लागले आहेत. 


'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका तरुणांच्या पसंतीस उतरते. मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दीपूची भूमिका साकारत आहे. तर अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दीपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या दोघांचा चाहतावर्गदेखील मोठा आहे. हृता दुर्गुळे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.


संबंधित बातम्या


Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' मालिकेत नवा ट्विस्ट; जयश्री-इंद्रामधला दुरावा दीपू करणार दूर


Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' मालिकेत नवा ट्विस्ट; सत्तुच्या घरी फुलणार इंद्रा-दीपूचा सुखी संसार