एक्स्प्लोर

Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' घेणार प्रेक्षकांचा निरोप; 'हा' कार्यक्रम होणार सुरू

Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाने फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता हा लोकप्रिय कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकार रातोरात स्टार झाले आहेत. हास्यजत्रेच्या पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांनी हा कार्यक्रम डोक्यावर घेतला आहे. या कार्यक्रमातील अनेक जोड्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. पण लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला हा कार्यक्रम आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाचं शूटिंगदेखील पूर्ण झालं आहे. 

कलाकारांच्या पोस्टमुळे रंगली चर्चा; चाहते नाराज

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील प्रियदर्शनी इंदलकर, रसिरा वेंगुर्लेकर आणि गौरव मोरे या कलाकारांनी सोशल मीडियावर शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचे फोटो शेअर केले आहेत. सेटवरचा फोटो शेअर करत प्रियदर्शनीने लिहिलं आहे,"दोन महिन्यांनंतर भेटू". रसिका वेंगुर्लेकरने लिहिलं आहे,"शेवटच्या शेड्युलचा शेवटचा दिवस...या माझ्या अतरंगी मित्रांबरोबरचे शेवटचे काही क्षण". 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

रसिका वेंगुर्लेकरने सेटवरचा एक फोटो शेअर करत लिहिलं आहे,"काळजी करू नका... 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बंद होत नाही आहे. आम्ही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची संपूर्ण टीम छोटीशी सुट्टी घेत आहोत. लवकरच येऊ तुमच्या भेटीला". 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचा या आठवड्यात शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा कार्यक्रम पुन्हा सुरू होऊ शकतो. या कार्यक्रमातील समीर चौघुले , विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, दत्तू मोरे, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर आणि वनिता खरात या कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची जागा घेणार 'हा' कार्यक्रम

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमाची जागा आता 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) हा कार्यक्रम घेणार आहे. 'कोण होणार करोडपती' 29 मेपासून सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता सोनी मराठीवर, असं म्हणत कोण होणार करोडपती'चा नवा प्रोमो आऊट करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या 29 मेपासून प्रेक्षकांना 'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. आता सचिन खेडेकर यांच्या 'कोण होणार करोडपती'च्या नव्या पर्वाची चाहत्यांना उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या

Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा हा फॅमिली शो नाही राहिला' नेटकऱ्याची टीका; पृथ्वीक प्रतापनं दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला, 'पॉर्न बघणाऱ्यांनी...'

महत्त्वाच्या बातम्या

Pooja Birari On Home Minister: 'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
Mohini Premachi Filmy Kahani: 'मोहिनी प्रेमाची फिल्मी कहाणी' मालिकेत रंजक ट्विस्ट; दांडपट्टा आणि तलवारबाजीचा थरार, समीर-अनघा यांचा अनुभव
'मोहिनी प्रेमाची फिल्मी कहाणी' मालिकेत रंजक ट्विस्ट; दांडपट्टा आणि तलवारबाजीचा थरार, समीर-अनघा यांचा अनुभव
Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
Nana Patekar Death Cause Revealed: नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Mukul Wasnik: कालपर्यंत ज्यांनी विविध राजकीय पक्षांना फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता स्वतःचे खासदार शाबूत ठेवावे लागतील: मुकुल वासनिक
राजकीय पक्ष फोडणाऱ्यांना स्वत:चे खासदार शाबूत ठेवाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, मुकुल वासनिक यांचा भाजपला टोला  
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
Ashutosh Ranka on PM Modi: आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट करुन टाकला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट केला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Panchayat Raj Abhiyan : पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
Abhijit Dipke Grandmother Death: आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
Embed widget