Maharashtrachi Hasyajatra Samir Choughule : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शोला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या शोमधील कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात. समीर चौघुले (Samir Choughule), विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर या कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या शोचे सुत्रसंचालन अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) करते. अभिनेत्री सई ताम्हणकर (sai tamhankar) आणि अभिनेता प्रसाद ओक (prasad oak) हे या शोचे परीक्षक आहेत. या शोमधील समीर चौघुलेचा चाहता वर्ग मोठा आहे. समीरला गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी एक खास भेटवस्तू दिली. या भेटवस्तूचे फोटो समीरने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
समीरने लता मंगेशकर यांनी दिलेल्या भेटवस्तूचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'निसर्ग किती ग्रेट आहे न ! शब्द संपले की भावनांना वाट मिळावी म्हणून त्याने अश्रूंची निर्मिती केली. आज ते प्रकर्षाने जाणवलं. आज सुरांची आणि स्वरांची सरस्वती आदरणीय लता मंगेशकर दीदींनी अत्यंत प्रेमाने घरी एक भेटवस्तू आणि माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ट्रॉफी पाठवली. आणि ती ट्रॉफी म्हणजे दिदींच्या हस्ताक्षरातील शुभेच्छा आणि आशीर्वाद. हा सुवर्ण क्षण आयुष्यात आला तो फक्त आणि फक्त आमच्या हास्यजत्रा कुटुंबामुळे.'
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शो बरोबरच 'फू बाई फू' आणि 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या शोमध्ये देखील समीने काम केले आहे. त्याने मुंबई मेरी जान, अजचा दिवस माझा, अ- पेईंग घोस्ट, विकून टाक आणि मुंबई टाईम या चित्रपटामध्ये काम केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :