Samantha Ruth Prabhu Naga Chaitanya Divorce : अभिनेत्री समंथाअक्किनेनी (Samantha Akkineni) आणि नागा चैतन्य  (Naga Chaitanya) यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाची माहिती दिली होती. या पोस्टमध्ये त्यांनी वेगळं होण्याच्या निर्णयाबद्दल सांगितले. अनेकांनी त्यांच्या या पोस्टवर कमेंट्स केल्या. विभक्त झाल्यानंतर या दोघांनी त्यांच्या पर्सनल लाइफबद्दल बोलणे टाळले. पण नुकत्याच एका मुलाखतीमध्ये समंथाने तिच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे. 


'2022 मध्ये कोणत्या गोष्टी घडव्यात असं तुला वाटतं?'असा प्रश्न नुकत्याच एका मुलाखतीमध्ये समंथाला विचारण्यात आला. या प्रश्नाला समंथाने उत्तर दिले, '2021 या वर्षात माझ्या पर्सनल लाइफमध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या. त्यामुळे आता मी कोणतीही आपेक्षा करत नाही. भविष्यात माझ्यासोबत जे काही घडेल त्यासाठी मी तयार आहे. मला इतकच माहित आहे की, मी माझ्याकडून शक्य आहेत तितके प्रयत्न करत राहणार आहे.    '


 समंथा आणि नागा चैतन्यची लव्ह स्टोरी 
‘ये माया चेसावे’ या तेलगू चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान समंथा आणि नागा चैतन्यची भेट झाली. त्यानंतर  ‘ऑटोनगर सूर्या’ या चित्रपटाच्या सेटवर ते पुन्हा भेटले. 6 ऑक्टोबर  2017 रोजी समंथा आणि नाग चैतन्य लग्नबंधनात अडकले.






सोशल मीडियवरील  समंथाची पोस्ट झाली होती व्हायरल
काही दिवसांपूर्वी समांथाने सोशल मीडियावर एक कविता पोस्ट केली आहे. यामध्ये लिहीले आहे, 'मी मजबूत आहे, मी  पर्फेक्ट नाही, पण मी स्वत: चं पर्फेक्ट वर्जन आहे. मी प्रेमळ आहे. मी कधीच हार मानत नाही. मी एक माणूस आहे, मी एक योद्धा आहे.' ही प्रेरणा देणारी कविता समंथाने सोशल मीडियावर शेअर केली. 


महत्त्वाच्या बातम्या :