Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज तृप्ती देसाई, स्नेहा वाघ आणि आदिश वैद्य जाणार आहेत. घरामध्ये जाताच सदस्यांना ते कुठे चुकत आहेत, कोण बरोबर खेळत आहेत, कोणाचा खेळ त्यांना आवडत आहे ते सांगणार आहेत. स्नेहाने जयला खडे बोल सुनावले तर विशालचे तृप्ती ताईंनी भरभरून कौतुक केले. तृप्ती ताईंकडून झालेल्या कौतुकामुळे विशालला अश्रु अनावर झाले.
तृप्ती देसाई विशालला म्हणाल्या,"सत्य परेशान हो सकता है पराजित नही ! लंबी रेस का घोडा है !मस्त एकदम". तृप्ती ताई मीराला म्हणाल्या,"तू फटक्यांमध्ये लक्ष्मी बॉम्ब आहेस. तर मीनल सुतळी बॉम्ब. तुम्ही दोघी मुलींमध्ये सगळ्यात स्ट्रॉंग खेळाडू आहात."
बिग बॉस मराठीच्या घरामधून काल कोणताच सदस्य घराबाहेर पडला नाही. आज घरातील सदस्यांना मोठं सरप्राईझ मिळणार आहे कारणं घरामध्ये एन्ट्री होणार नव्या सदस्यांची. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी जाहीर केले आहे, घरात येत आहेत नवीन सदस्य.. आणि एंट्री झाली स्नेहा वाघ, आदिश वैद्य आणि तृप्ती देसाईंची. घरामध्ये एन्ट्री करताच स्नेहा वाघने जयवर निशाणा साधला आहे. स्नेहाच्या बोलण्याने जय दुखावला गेला आहे. त्याने तसे न बोलता कृतीतून दाखवले. याच संदर्भात आज मीरा जयची समजूत काढताना दिसणार आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha