Maharashtra Television News : विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...
अरुंधती परत आल्याने सगळ्यांना झाला आनंद; 'आई कुठे काय करते !' च्या प्रोमोनं वेधलं लक्ष
Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतील अरुंधती परदेशी गेल्याचं दाखवण्यात आलं होतं. अरुंधती गेल्यानंतर मालिकेतील घडामोडींना मालिकाप्रेमी कंटाळलेले होते. आता अरुंधतीची मालिकेत एन्ट्री झाली आहे. अरुंधतीची मालिकेत एन्ट्री झाल्यानं सगळ्यांना आनंद झाला आहे. नुकताच 'आई कुठे काय करते' या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये अरुंधती ही अशुतोषचे आभार मानताना दिसत आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Anupamaa Spoiler: गुरुमा डिंपल आणि समरला देणार खास गिफ्ट; 'अनुपमा' मालिकेच्या आगामी एपिसोडमध्ये काय घडणार? जाणून घ्या
Anupamaa Spoiler: अनुपमा (Anupamaa) मालिकेच्या गेल्या एपिसोडमध्ये दिसले की, डिंपल आणि समर यांच्या लग्नाचे विधी शाह हाऊसमध्ये पार पडले. गेल्या एपिसोडमध्ये डिंपलची खरी आई तिचे कन्यादान करते, हे दाखवण्यात आले होते. यानंतर मालिकेत गुरूमाची देखील एन्ट्री होते. अनुपमा मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्येही भरपूर ड्रामा पाहायला मिळणार आहे. जाणून घेऊयात अनुपमा मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये काय दाखवण्यात येणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
KKK 13: खतरों के खिलाडी 13 मध्ये खतरनाक स्टंट करणार 'हे' स्पर्धक, 'या' 5 कारणांमुळे रोहित शेट्टीचा शो होणार सुपरहिट?
KKK13: प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi 13) हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो आहे. या कार्यक्रमाचा 13 वा सीझन पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. बॉलिवूड, डेली सोप, म्युझिक इंडस्ट्री यासारख्या क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी या शोचे स्पर्धक म्हणून भाग घेत असतात. सध्या दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये 'खतरों के खिलाडी 13'चे शूटिंग सुरू आहे. खतरों के खिलाडी या कार्यक्रमाचा यंदाचा सीझन या पाच कारणांमुळे खास असणार आहे. जाणून घेऊयात ती करणे...
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Tujhech Mi Geet Gaat Aahe : मोनिकाने मागितली मंजुळाची माफी; 'तुझेच मी गीत गात आहे’ चा प्रोमो व्हायरल
Tujhech Mi Geet Gaat Aahe : तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेत अनेक ट्वीस्ट येत असतात. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मंजुळाला स्वराजनं एका खोलीमध्ये कोंडलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
व्हायरल व्हिडीओमुळे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम समीर चौघुलेला मागावी लागली माफी; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या...
Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या शोमधील कलाकार आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या कार्यक्रमामध्ये विविध सेलिब्रिटी हजेरी लावतात. सध्या या कार्यक्रमातील समीर चौघुले (Samir Choughule) या अभिनेत्याच्या एका व्हिडीओची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे समीरला माफी मागावी लागली आहे.