KKK13:  प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi 13) हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो आहे. या कार्यक्रमाचा 13 वा सीझन पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. बॉलिवूड, डेली सोप, म्युझिक इंडस्ट्री यासारख्या क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी या शोचे स्पर्धक म्हणून भाग घेत असतात. सध्या दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये 'खतरों के खिलाडी 13'चे शूटिंग सुरू आहे.  खतरों के खिलाडी या कार्यक्रमाचा यंदाचा सीझन या पाच कारणांमुळे खास असणार आहे. जाणून घेऊयात ती करणे...


 शिव ठाकरे आणि अर्चना गौतम


शिव ठाकरे आणि अर्चना गौतम बे बिग बॉसच्या 16 व्या सिझनमध्ये एकत्र दिसले होते. आता ते दोघे ‘खतरों के खिलाडी 13’ मध्ये देखील एकत्र दिसणार आहेत. शिव आणि अर्चना यांच्यात बिग बॉस या शोमध्ये अनेकदा वाद व्हायचे. आता ‘खतरों के खिलाडी 13’ मध्ये देखील या दोघांमध्ये वाद होतील का? याचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल. ‘खतरों के खिलाडी 13’ मध्ये अर्चना आणि शिव यांची जोडी पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 


शिझान खान


तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी  शिझान खानला  अटक झाली होती. त्यानंतर शिझान खानची जामिनावर तुरुंगातून सुटका झाली होती. यापूर्वी तो 'अली बाबा दास्तान-ए-काबुल' या टीव्ही शोमध्ये मुख्य भूमिकेत होता. आता  'खतरों के खिलाडी 13' द्वारे शिझान छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. 


अब्दू रोजिकची होणार एन्ट्री


रिपोर्टनुसार, बिग बॉस 16 फेम अब्दू रोजिक  देखील 'खतरों के खिलाडी 13' चा भाग असणार आहे.बिग बॉस 16 मध्ये सहभागी झाल्यानंतर गायक आणि सोशल मीडिया स्टार अब्दूला  प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता त्याला  'खतरों के खिलाडी 13' मध्ये पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 


डेझी शाहची छोट्या पडद्यावर एन्ट्री



बॉलिवूड अभिनेत्री डेझी शाह ही  'खतरों के खिलाडी 13' मधून छोट्या पड्यावर एन्ट्री करणार आहे. एका रिपोर्टनुसार,डेझी ही या कार्यक्रमाच्या एका एपिसोडची 15 लाख फी घेत आहे. 


दक्षिण आफ्रिकेतील जंगलात  होणार शूटिंग



शोचे स्पर्धक सुरुवातीच्या दिवसांत दक्षिण आफ्रिकेतील जंगलात शूटिंग करताना दिसणार आहेत. खतरों के खिलाडीच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असेल की, स्पर्धकांना पाच दिवस थेट जंगलात नेले जाईल. त्यानंतर शो पुढे काय होणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 


'खतरों के खिलाडी 13' च्या ट्रॉफीसाठी स्पर्धकांना करावे लागणार खतरनाक स्टंट
 
'खतरों के खिलाडी 13' च्या स्पर्धकांमध्ये डेझी शाह, अरिजित तनेजा, शिझन खान, रुही चतुर्वेदी, रोहित बोस रॉय, रश्मीत कौर, अंजुम फकीह, अंजली आनंद, शिव ठाकरे, सौंदस मुफ्कीर, न्यारा एम बॅनर्जी, अर्चना गौतम आणि अराजित शर्मा हे सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. हे सर्व स्पर्धक  'खतरों के खिलाडी 13' च्या ट्रॉफीसाठी खतरनाक स्टंट करणार आहेत. 


 


Sheezan Khan KKK 13 : 'खतरों के खिलाडी 13'साठी शीझान खान दक्षिण आफ्रिकेत दाखल; पोस्ट शेअर करत म्हणाला,"नवी सुरुवात..."