Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत आता रोमॅंटिक ट्रॅक सुरू आहे. अरुंधती आणि आशुतोषच्या संसार नुकताच सुरू झाला असून आता मालिकेच्या आगामी भागांमध्ये त्यांच्या जवळीक वाढलेली दिसून येईल. 


अरुंधती आणि आशुतोष नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. आता मालिकेच्या आगामी भागाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अरुंधती आणि आशुतोष यांच्यातील गोड संवाद आणि हळवे क्षण पाहायला मिळत आहे. 


व्हायरल व्हिडीओमध्ये अरुंधतीची तब्येत बिघडल्याने ती आराम करताना दिसत आहे. दरम्यान आशुतोष तिला प्रेमाने गोंजारताना दिसत आहे. तो तिच्या डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवताना दिसत आहे. अरुंधती-आशुतोषची वाढती जवळीक पाहता मालिकाप्रेमी आनंदी झाले आहेत. 






अरुंधती दरम्यान तिच्या मनातील भावना व्यक्त करते. ती म्हणतेय,"तुमचा सहवास मला हवाहवासा वाटतो. तुम्ही जवळ असला की मला खूप बरं वाटतं. मला तुम्ही खूप आवडता आशुतोष..' त्यावर आशुतोष म्हणतो, 'तूही मला खूप आवडतेस..'. मालिकेच्या आगामी भागाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मालिकेच्या आगामी भागात अखेर अरुंधती आपल्या प्रेमाची कबुली देणार आहे. हा भाग पाहण्यासाठी मालिकाप्रेमी उत्सुक आहेत.


अरुंधती आशुतोषला 'आय लव्ह यू' म्हणणार का?


आशुतोष अरुंधतीला एकदा 'आय लव्ह यू' म्हण असं सांगतो. त्यावर विषय बदलत अरुंधती म्हणते,"शिरा करत आहे. मग वेलदोडे सापडत नव्हते. तुम्हाला शिरा पाठवू का शिरा.. आणि तेच ते... त्यानंतर आशुतोषची आई जोरात म्हणते, मी जाते. म्हण तू तुला काय आय लव्ह यू वगैरे बोलायचं असेल तर. त्यानंतर अरुंधती आशुतोषचा फोन कट करते. त्यामुळे आता अरुंधती आशुतोषला "आय लव्ह यू" म्हणणार का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.


'आई कुठे काय करते' मालिकेमध्ये अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) या अरुंधती ही भूमिका साकारत आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेत ओंकार गोवर्धन हा आशुतोष ही भूमिका साकारतो. या मालिकेमध्ये अनिरुद्ध देशमुख ही भूमिका अभिनेते  मिलिंद गवळी हे साकारतात. तर  संजना ही भूमिका अभिनेत्री रूपाली भोसले ही साकारते.


 संबंधित बातम्या


Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेत मोठा ट्वीस्ट; अनिशचे आई-बाबा येणार म्हणून अनिरुद्ध चिडला