Aai Kuthe Kay Karte : स्टार प्रवाह वाहिनीवरील (Star Pravah) आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. जवळपास पाच वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यानंतर अखेरीस ही मालिका ऑफ एअर झाली. पण आता या मालिकेचं दुसरं पर्व येणार का याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. यावरच मालिकेत अरुंधती ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने यावर भाष्य केलं आहे. 


आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांमध्ये तुफान गाजली. सुरुवातीला संध्याकाळी 7.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणारी ही मालिका काही काळ दुपारी देखील प्रेक्षकांच्या भेटीस आली. पण आता या मालिकेच्या जागी निवेदिता सराफ यांची आईबाबा रिटायर होत आहेत ही मालिका सुरु होणार आहे. पण सध्या आई कुठे काय करते मालिकेचं दुसरं पर्व येणार का? हीच उत्सुकता प्रेक्षकांना आहे. 


आई कुठे काय करते मालिकेचं दुसरं पर्व येणार?


मधुराणीने नुकतच तिच्या इन्स्टाग्रामवर एक लाईव्ह सेशन घेतलं. त्यावेळी मधुराणीला आई कुठे काय करते मालिकेच्या दुसऱ्या पर्वाविषयी विचारण्यात आलं होतं. त्यावर मधुराणीने म्हटलं की, स्टार प्रवाहला हे नक्की पाठवा आणि त्यांनी जर ठरवलं तर आम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा दुसरं पर्व करायला खूप आवडेल...


मधुराणीची भावनिक पोस्ट


दरम्यान मालिकेचा शेवटचा भाग 30 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आला. त्यावर मधुराणीने भावनिक पोस्ट शेअर करत म्हटलं की,आई कुठे काय करते चा प्रवास आज थांबला….पण तो संपला नाही… कारण आई हे तत्व आहे….. ते कस संपेल… तो अनेक वर्षं असंख्य जणांच्या मनात घर करून राहणार आहे.मायबाप प्रेक्षकांचे आणि त्या विधात्याचे संपूर्ण टीम कडून मी पुन्हा एकदा आभार मानते….!!! 






ही बातमी वाचा : 


कोरियाच्या लोकांत शाहरुख खानची क्रेझ, 'मोहोब्बते' पिक्चरच्या पडले प्रेमात, केलं असं काही की जगभरात होतेय चर्चा!