मुंबई : शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूडवर अधिराज्य गाजवतोय. त्याला बॉलिवूडचा बादशाहा म्हटलं जातं. सिनेसृष्टीत आजही त्याचं नाव मोठ्या आदबीने घेतलं जातं. तो घराच्या बाहेरजरी निघाला तर हजारो लोकांची गर्दी होते. त्याच्याएवढी फॅनफॉलोविंग अपवादानेच अन्य अभिनेत्याला आहे. विशेष म्हणजे फक्त भारतातच नव्हे तर जगभरातील वेगवेगळ्या देशात त्याची क्रेझ आहे. दक्षिण कोरियातही त्याचे अनेक चाहते आहेत. दरम्यान, त्याची हीच क्रेझ दाखवणारा असाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुखच्या चाहत्यांनी त्याच्या मोहोबत्ते या चित्रपटातील एका गाण्याचा सीन रिक्रिएट केला आहे. 


दक्षिण कोरियातील लोक शाहरुखचे चांगलेच दिवाने आहेत.शाहरुखचे चाहते असलेल्या अशाच काही लोकांनी मोहोब्बते या चित्रपटातील एका गाण्याची जशीच्या तशी कॉपी केली आहे. ही कॉपी एवढी हुबेहुब आहे, की नृत्याच्या स्टेप्स, वेशभूषा असं सगळं जसंच्या तसं आहे. हा व्हीडओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 


मोहोब्बते चित्रपटातील कोणत्या चित्रपटाची केली कॉपी


मोहोब्बते या चित्रपटात शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय यांची प्रमुख भूमिका आहे. अमिताभ बच्चन यांनीदेखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारलेली आहे. विशेष म्हणजे इतरही इनेक चेहरे या चित्रपटात आहेत. प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. आजही हा चित्रपट अनेकजण आवडीने  पाहतात. विशेष म्हणजे या चित्रपटातील गाण्यांची अनेकांना आजही तेवढीच भूरळ आहे. दक्षिण कोरियातही या चित्रपटातील गाणे चांगलेच प्रसिद्ध आहेत. शाहरुखच्या काही चाहत्यांनी याच चित्रपटातील गाण्याला रिक्रिएट केले आहे. आंखें खुली हों या हों बंद, दीदार उनका होता है, या गाण्याला दक्षिण कोरियातील कलाकारांनी रिक्रिएट केलं आहे. त्यांनी एक डान्स व्हिडीओ तयार केला आहे. यामध्ये मोहोब्बते चित्रपटात कलाकार ज्याप्रमाणे डान्स करतात, अगदी त्याच पद्धतीने दक्षिण कोरियातील कलाकारही डान्स करताना दिसतात. विशेष म्हणजे या कलाकारांनी वेशभूषाही अगदी हुबेहुब केली आहे. मोहोब्बते चित्रपटात शाहरूख खानला चष्मा असतो. दक्षिण कोरियातील व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओतही शाहरुखचे पात्र साकारणाऱ्या कलाकाराच्या डोळ्यांवर चष्मा दिसत आहे. त्यांनी चित्रपटातील दृश जसंच्या तसं उभारल्यामुळे हा व्हिडीओ अनेकांच्या पसंदीस पडला आहे.




नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया


दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर अगदी कमी काळात व्हायरल झाला आहे. भारतातील नेटकरी या व्हिडीओवर भरभरून व्यक्त होत आहेत. हा व्हिडीओ तर खऱ्या व्हिडीओपेक्षाही ओरिजनल वाटत आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. एका नोटकऱ्याने हे गाणं कोरियातील नव्हे तर इंडोनेशियातील आहे, असा दावा केलाय. आणखी एका युजरने कोरियाच्या लोकांनी हिंदी शिकून घेतली आहे, अशी भन्नाट कमेंट केली आहे. दरम्यान, सध्या हा व्हिडीओ सगळीकडे चर्चाचा विषय ठरलाय.  


हेही वाचा :


दुआ लिपाच्या लईव्ह कॉन्सर्टमध्ये शाहरुखचा जलवा, चक्क किंग खानच्या गाण्यावर केलं परफॉर्म; प्रेक्षकही अचंबित!  


57 वर्षांत एकाच नावाचे 6 चित्रपट, राजेश खन्नांपासून ते इम्रान हाश्मीपर्यंत अनेकांची भूमिका; कोण ठरलं हिट कोण फ्लॉप?