Aai Kuthe Kay Karte : मागील काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आणि मालिकाविश्वात एकाच मालिकेची चर्चा सुरु आहे. स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेने सध्या बराच मोठा ट्विस्ट घेतला आहे. मालिकेने घेतलेल्या या वळणामुळे प्रेक्षकांनी देखील बरीच नाराजी व्यक्त केली. त्याचप्रमाणे या मालिकेतून आशुतोषची भूमिका साकारणारा अभिनेता ओमकार गोवर्धन (Omkar Govardhan) याने मालिकेतून निरोप घेतलाय. त्याच्यासाठी मालिकेतील कलाकारांनी देखील पोस्ट लिहिली होती. त्यावर आता अरुंधतीने म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने देखील त्याच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. 


मधुराणीची पोस्ट काय?


मधले काही दिवस कोणतीही पोस्ट करायच्या मनस्थितीमध्ये नव्हते त्यामुळे ही उशीराने डकवतेय. आशुतोषचं 'जाणं ' अनेकांना आवडलं नाहीये. कसं आवडेल. आयुष्यात घडणाऱ्या अप्रिय घटना आवडत नाहीतच आपल्याला... पण स्वीकाराव्या लागतातच. तसंच आशुतोष जाणं आपल्याला स्वीकारावं लागेल. गेले अनेक दिवस दुखवट्याचे सीन्स करते आहे, असं या पोस्टमध्ये मधुराणीने म्हटलं आहे. 


12-13  तास सलग असे काही दिवस रडते आहे - मधुराणी


12/ 13  तास सलग असे काही दिवस रडते आहे... ! अभिनय अभिनय म्हंटलं तरी तुमच्यातला एक भाग तुम्ही ओतता, काही पणाला लावता तेव्हाच तो खरा वाटतो..  काही दिवस प्रचंड थकवणारे होते इतके की त्याचा काही प्रमाणात तब्येतीवरही परिणाम झालाच... डेलीसोप मध्ये भावनिक व्यवस्थापन करण्यासाठी बऱ्याचदा वेळ मिळत नाही ( unwind होण्यासाठी ) आणि त्याचे परिणाम दिसून येतात .अरुंधती आशुतोषला मिस करतेय तशीच आम्हाला सगळ्यांना ओंकारची तितकीच आठवण येतेय.ओंकार, आपल्या फालतू पासून गंभीर विषयावरच्या गप्पा, 90s ची गाणी मोठमोठ्याने गाणं, विषय कुठलाही असो त्यातलं तुला सखोल माहीत असणं, आणि आजूबाजूचं वातावरण हसतखेळत ठेवायचं तुझं कसब हे सगळं मिस होतंय. पुढे परत काम करूच....!! पण हा प्रवास कायम स्मरणात राहील.., अशी पोस्ट अरुंधतीने केलीये. 






ही बातमी वाचा : 


Amit Thackeray on Politics : '...तर राजकारणात आलोच नसतो', अमित ठाकरेंनी राजकारणात येण्याचं स्पष्ट कारणच सांगितलं; तरुण पिढीलाही दिला सल्ला