Premachi Goshta Episode Highlights : प्रेमाची गोष्ट (Premachi Goshta) या मालिकेत सागर मुक्तामधील प्रेमाची गोष्ट सुरु व्हायला लागली आहे. पण सावनी वारंवार त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करतेय. त्यासाठी सावनी आदित्यचा वापर करतेय. धुळवडीच्या निमित्ताने सागर-मुक्ताच्या आयुष्यात नवे रंग भरले जात असतानाच पुन्हा एकदा सावनी आदित्यचा वापर करुन त्यांच्या नात्याचा बेरंग करणार असल्याचं पाहायला मिळतंय. तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) मुख्य भूमिकेत असणारी प्रेमाची गोष्ट ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे.
प्रेमाची गोष्ट मालिकेत सध्या आदित्य मुक्ता आईकडे म्हणजेच माधवी गोखलेंकडे त्याच्या कॉउन्सलिंगसाठी येत असल्याचं पाहायला मिळत होतं. त्यावेळी मुक्ता आदित्यच्या मनात सागरविषयीच्या गोड आठवणी पुन्हा जाग्या करण्याचा प्रयत्न करते. पण सावनीला हे कळतं आणि ती आदित्यसमोर मुक्ताचं खरं आणते. त्यामुळे पुन्हा एकदा मुक्ता आदित्यच्या मनातून उतरते आणि तो मुक्ताला काही गोष्टी ऐकवतो. पण कोळी कुटुंबिय मुक्ताला आदित्यला होळीसाठी आणण्याचा आग्रह करतात.
सागर-मुक्तीची प्रेमाची गोष्ट सुरु होण्याआधीच संपणार?
दरम्यान होळीला जेव्हा आदित्य येतो तेव्हा सगळ्यांनाच आनंद होतो. दुसऱ्या दिवशी धुळवडीच्या दिवशी सागर मुक्ताला तिच्यावरील प्रेमाची कबुली देतो. त्यावेळी सावनी पुन्हा एकदा सागर आणि मुक्ताच्या नात्याविषयी आदित्यच्या मनात विष कालवते. त्यामुळे आदित्य पुन्हा एकदा चिडतो. जेव्हा सागर मुक्ताच्या प्रेमावरची कबुली देते तेव्हा सावनी आदित्यला म्हणते की, तुझा पप्पा विसरला आहे तुला, तो खूश आहे त्याच्या नवीन बायकोसोबत. त्यावर पुन्हा आदित्यला मुक्ताचा राग येतो.
हे पाहताच आदित्य पार्टीतून बाहेर जातो, पण सागर त्याला अडवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या मागे मुक्ताही येते. तेव्हा आदित्य चिडून सागरला म्हणतो की, तुमच्यासाठी महत्त्वाची फक्त आणि फक्त तुमची ती नवीन बायको आहे. त्यावर सागर आदित्यला म्हणतो की, माझ्यासाठी तू महत्त्वाचा आहेस. माझं मुक्तावर अजिबात प्रेम नाही. हे सगळं मागे उभी असलेली मुक्ता ऐकते. ते ऐकून ती सागरच्या कानशिलात लगावते. त्यावर मुक्ता सागरला म्हणते की, मी खरचं या सगळ्याला प्रेमाची गोष्ट समजत होते. यापुढे सईची आई हे एकच नातं माझ्यासाठी महत्त्वाचं असेल. त्यामुळे सावनीमुळे सागर - मुक्ताच्या प्रेमाची गोष्ट सुरु होण्याआधीच संपणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.