Amit Thackeray on Politics : अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना यंदाचा झी युवा सन्मान 2024 या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यावेळी अमित ठाकरे यांच्यासह त्यांची आई आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) त्याचप्रमाणे अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली ठाकरे यावेळी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाआधी कॉन्टेन्ट क्रिएटर अर्थव सुदामे याने अमित ठाकरे यांची एक मुलाखत घेतली. त्यावेळी अमित ठाकरेने त्यांच्या राजकारणातील करिअरविषयी भाष्य केलं आहे. 


तसेच यावेळी अमित ठाकरेंनी राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या तरुण पिढीला देखील सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटलं की, सध्या राजकारणात मला प्रामाणिकपणा आणि संयम हे दोन्ही दिसत नाही. त्यामुळे राजकारणात येणाऱ्या नव्या पिढीकडून त्या अपेक्षा आहेत. 


तर मी राजकारणात नसतो - अमित ठाकरे


यावेळी अमित ठाकरे यांनी म्हटलं की, मी जर राज ठाकरेंचा मुलगा नसतो तर मी  राजकारणात आलोच नसतो.मी काहीही वेगळं केलं असतं. माझ्या वडिलांना मला एक प्लॅटफॉर्म तयार करुन दिला. तो प्लॅटफॉर्म मी पुढच्या लोकांपर्यंत घेऊन जातोय. डोकं खाली ठेवा आणि लोकांसाठी काम करा, एकमेकांना शिव्या घालणं बंद करा. 






अमित ठाकरेंचा तरुणांना सल्ला


सध्याच्या राजकाण्यांमध्ये मी प्रमाणिकपणा आणि संयम या दोन्ही गोष्ट पाहत नाही. त्यामुळे मला या दोन्ही गोष्टी येणाऱ्या तरुण पिढीमध्ये पाहायच्या आहेत. राजकारणात निवडणुका या पाच वर्षांनीच येतात. त्यामुळे राजकारणात तुम्ही संयम ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे, असंही अमित ठाकरे यांनी म्हटलं होतं. 


मला लोकांच्या चेहऱ्यावर हास्य बघायचंय - अमित ठाकरे 


तुम्ही जर मुख्यमंत्री झालात तुम्हाला कोणते तीन बदल प्रामुख्याने करायला आवडतील असा प्रश्न देखील यावेळी अमित ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर अमित ठाकरेंनी म्हटलं की, मला कोणत प्रमुख बदल असे नाही पण  लोकांच्या फार बेसिक गरजा आहेत. त्या गरजा पूर्ण करुन मला त्यांच्या चेहऱ्यावर हास्य बघायचंय आहे. 


ही बातमी वाचा : 


Amol Kolhe : उद्या अशोक सराफ तुमच्याविरोधात बोलले तर त्यांचाही महाराष्ट्र भूषण पुरस्कार.... अमोल कोल्हेंचा अजितदादांवर पलटवार