Lakshmichya Pavalani :  काही महिन्यांपूर्वी स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर सुरु झालेल्या 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' (Lakshmichya Pavalani) मालिका ही सध्या रंजक वळणावर आहे. चांदेकरांच्या घरात नयना ऐवजी कलाने गृहप्रेवश केला असला तरीही चांदेकरांनी मात्र अजूनही कलाला स्विकारलं नाही आहे. त्यामुळे चांदेकरांच्या घरात कलाला नयनाच्या वागण्याची शिक्षा भोगावी लागणार असल्याचं पाहायला मिळतंय. रविवार 18 फेब्रुवारी रोजी या मालिकेचा महाएपिसोड प्रदर्शित करण्यात येणार आहे. 


अद्वैत चांदेकरचं नयनाशी लग्न ठरतं. पण अद्वैतचा भाऊ राहुल याच्यासोबत नयना ही लग्नाच्या दिवशीच पळून जाते. त्यावेळी नयनाची आई कलाला मांडवात उभी करते. लग्नमंडपातच अद्वैतला कलाचं सत्य कळतं पण चांदेकरांच्या इब्रतीसाठी अद्वैत आणि कलाचं लग्न होतं. पण चांदेकरांच्या घरामध्ये कलाला तिचं स्थान प्रत्येकाच्या मनात निर्माण करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागणार असल्याचं पाहायला मिळणार आहे. 


मालिकेचा नवा प्रोमो


दरम्यान या मालिकेचा महाएपिसोड रविवारी प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्याआधी मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलाय. या प्रोमोमध्ये अद्वैत नयनाच्या सगळ्या आठवणी जाळून टाकतो. तसेच यापुढे कधीही प्रेमात पडणार नसल्याचं देखील अद्वैत म्हणतो. तर सरोज या सगळ्यासाठी कलाला जबाबदार धरते आणि तिला कधीही माफ करणार नसल्याचं तिला स्पष्ट सांगते. 






'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेची स्टार कास्ट


अक्षर कोठारी,  ईशा केसकर,  दिपाली पानसरे आणि किशोरी आंबिये हे कलाकार लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अभिनेत्री इशा केसकर ही "लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेत  कला खरे ही भूमिका साकारत आहे.


'स्टार प्रवाह' (Star Pravah) वाहिनीवरील 'लक्ष्मीच्या पावलांनी' (Lakshmichya Pavalani) मालिका ही अल्पावधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तीन बहिणी आणि त्यांच्या आईची मुलींच्या लग्नासाठी सुरु असलेली धडपड असा सर्वसाधारणपणे आशय आणि गोष्ट या मालिकेची आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून अद्वैत आणि कलाच्या लग्नाची धूम प्रेक्षकांना पाहायला मिळत होती. 


ही बातमी वाचा : 


Bhagya Dile Tu Mala : कावेरी आणि राजवर्धनच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची चाहुल, पण किमयामुळे नात्याला नवं वळण येणार? मालिका रंजक वळणावर