Lagnachi Bedi : सध्या छोट्या पडद्यावरून वेगवेगळ्या विषयांवरील मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. लवकरच लग्नाची बेडी (Lagnachi Bedi) ही मलिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही मालिका 31 जानेवारीपासून सुरू होणार आहे. मालिकेत संकेत पाठक आयपीएस ऑफिसर राघव रत्नपारखी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. तर सायली देवधर सिंधू सावंत ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
देशावर मनापासून प्रेम करणारा आणि गुन्हेगारीचा खात्मा करण्यासाठी जीवाची बाजी लावायलाही मागेपुढे न पाहाणारा असा आयपीएस ऑफिसर राघव रत्नपारखी असणार आहे. तर सिंधू ही कोकणात वाढलेली मुलगी आहे. तिची शिकण्याची प्रबळ इच्छा आहे. तिचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न आहे. डॉक्टर झाल्यानंतरही गावातल्या लोकांची सेवा करण्याची तिची इच्छा आहे. महत्त्वाकांक्षी आणि खंबीर असं हे पात्र आहे. कुठल्याही परिस्थितीत ठामपणे उभी रहाणारी आणि स्वत:ची मतं मांडणारी सिंधू सावंत आहे.
सिंधूचं आपल्या वडिलांवर खूप प्रेम आहे. त्यांची ती मनापासून सेवा करते. मात्र नियतीच्या मनात दुसरंच काहीतरी आहे. वडिलांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सिंधूला तिच्या वडिलांना गमवावं लागतं. यामागे नेमकं कोणतं कारण दडलं आहे हे मालिकेतून उलगडलं जाणार आहे. ही नवी मालिका 31 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या
Abhijeet Bichukale : असे शंभर सलमान दारात उभे करेन माझी गल्ली झाडायला; अभिजीत बिचुकले सलमान खानवर भडकला
Republic Day 2022 Song : बॉलिवूडमधील ‘ही’ देशभक्तीपर गाणी ऐकून अंगावर रोमांच उभे राहतील
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha