Krushna Abhishek : छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय कार्क्रम ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma show) लवकरच टीव्हीवर पुंरागमन करणार आहे. हा शो नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. मात्र, दोन महिन्यांपूर्वी हा शो ऑफ एअर गेला होता. परंतु, निर्माते आता लवकरच नवीन सीझन घेऊन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकतीच कपिल शर्मा (Kapil Sharma) आणि अर्चना पूरण सिंह (Archana Puran Singh) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून, नवीन सीझन लवकर सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, आता या शोबद्दल एक नवीन माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, प्रसिद्ध अभिनेता कृष्णा अभिषेकने (Krushna Abhishek) कपिल शर्मा शोला अलविदा केला आहे.
कपिल त्याच्या संपूर्ण टीमसोबत कॅनडा दौऱ्यावर होता आणि तिथे त्याने अनेक ठिकाणी त्याचे शो देखील केले. या दौऱ्यात कृष्णा अभिषेकही कपिलसोबत होता. आता टीम मायदेशात परतली आणि आता शोच्या नवीन सीझनची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, कृष्णा आता या शोचा भाग नसल्याची बातमी समोर आली आहे.
नेमकं कारण काय?
मीडिया रिपोर्टनुसार, कृष्णा अभिषेक याने कपिल शर्मा शो सोडला आहे आणि आता शोच्या चौथ्या सीझनमध्ये तो दिसणार नाही. अभिनेत्याने शो सोडण्यामागील कारण अॅग्रीमेंट इशू असल्याचे म्हटले आहे. शोचे निर्माते अभिनेता कृष्णाने मागितलेले मानधन देण्यास तयार नाहीत आणि हेच त्याच्या शोमधून बाहेर पडण्याचे मुख्य कारण मानले जात आहे.
सुनील ग्रोव्हर आणि अली असगर यांसारखे प्रसिद्ध अभिनेते आधीच कपिल शर्मा शोमधून बाहेर पडले आहेत आणि या शोमध्ये कृष्णा अभिषेक देखील दिसणार नाहीय. इतकंच नाही तर, अभिनेत्री भारती सिंह देखील यंदाच्या सीझनमध्ये दिसणार नाहीये. भारती नुकतीच आई झाली आहे. आता तिला थोडा वेळ बाळासोबतही घालवायचा आहे. तसेच, तिच्या हातात आणखी काही प्रोजेक्ट असल्याने ती आधी ते पूर्ण करणार आहे.
अक्षय कुमार करणार नव्या सीझनचा शुभारंभ!
पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून कपिल आणि त्याची टीम 'द कपिल शर्मा शो'च्या नव्या पर्वाची तयारी करत आहेत. 'द कपिल शर्मा शो'च्या येत्या पर्वातील पहिल्या भागात अक्षय कुमार सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे. 'द कपिल शर्मा शो'च्या आगामी भागात अक्षय त्याच्या आगामी 'कटपुतली' सिनेमाचं प्रमोशन करताना दिसून येणार आहे. त्यामुळे या भागात अक्षय कुमारसह रकुल प्रीत सिंह आणि सरगुन मेहतादेखील हजेरी लावणार आहेत.
हेही वाचा :
The Kapil Sharma Show : नवा लूक अन् डॅशिंग अवतार! कपिल शर्मा लवकरच टीव्हीवर परतणार