Appi Amchi Collector : ‘झी मराठी’ वाहिनीवर सध्या प्रेक्षकांना मनोरंजनाची नवी मेजवानी मिळाली आहे. नुकतीच ‘अप्पी आमची कलेक्टर’ (Appi Amchi Collector) ही मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेतून एक वेगळाच विषय हात्ल्ण्यात येत आहे. अपर्णा सुरेश माने म्हणजे ‘अप्पी’ ही अशी मुलगी आहे, जी खेडे गावात रहाते, जिथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत, तिला कुठले मार्गदर्शन नाही. पण, तिचं ध्येय खूप मोठं आहे. ती येणाऱ्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करुन कलेक्टर होते. अशी ही अप्पीची संघर्ष कथा या मालिकेतून पाहायला मिळणार आहे.


सातारा आणि कोल्हापूर येथे ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेच्या प्रमोशनच्या निमित्ताने रॅलीच आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला पत्रकारांनी, सातारकरांनी व कोल्हापूरकरांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. या रॅलीचे खास आकर्षण म्हणजे मालिकेच्या निर्मात्या श्वेता शिंदे आणि आपली सगळ्यांची लाडकी अभिनेत्री शिवानी नाईक म्हणजेच अप्पी.. या दोघींनी दणक्यात ढोल वाजवून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. शिवानी नाईक ही उत्कृष्ट ढोलवादन करते.



‘अप्पी’चं ढोलवादन!


सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये मालिकेच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,  या कार्यक्रमाला सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी (कलेक्टर) माननीय श्री रुचेश जयवंशी, अप्पी-शिवानी नाईक, बापू-संतोष पाटील तसेच मालिकेचे निर्माते श्वेता शिंदे, संजय खांबे आणि छत्रपती शिवाजी कॉलेजच्या वतीने उपप्राचार्या शेख मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी माननीय जिल्हाधिकारी यांनी आपले मोलाचे मार्गदर्शन केले तसेच कलाकारांनी आपले अनुभव व्यक्त केले. यानंतर प्रश्नोत्तराचा सुद्धा तास झाला, यावेळी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा आणि करिअरकडे कसे पाहावे, याबद्दल चर्चा करण्यात आली. या प्रेरणात्मक मालिकेचे लेखन अभयसिंह जाधव यांचे असून, दिग्दर्शन आशुतोष बाविस्कर यांचे आहे. या मालिकेत शिवानी नाईकसोबत रोहित परशुराम प्रमुख भूमिकेत असणार आहे. ही मालिका 22 ऑगस्टपासून संध्याकाळी 7 वाजता  प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचे चित्रण सध्या सातारा आणि आसपासच्या गावात होत आहे.


नव्या मालिकांची मेजवानी


झी मराठीवर सध्या नव्या मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. प्रत्येक मालिकेची कथा हटके असल्याने त्यांना प्रेक्षकांची देखील पसंती मिळत आहे. 'तू चालं पुढं',  'नवा गडी नवं राज्य', 'बस बाई बस', 'डान्स महाराष्ट्र डान्स', 'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं'  या नव्या मालिकांनी प्रेक्षकांना पुन्हा एकदा प्रेक्षकांना या वाहिनीकडे वळण्यास भाग पाडले आहे.


हेही वाचा :


Appi Amchi Collector : 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेच्या प्रोमोची चर्चा; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस